अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकीच्या १९ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीत निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST2021-06-09T04:34:44+5:302021-06-09T04:34:44+5:30
आष्टा : येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयातील १९ विद्यार्थ्यांची एक्सचेंजर या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाली आहे, अशी माहिती संस्थेचे ...

अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकीच्या १९ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीत निवड
आष्टा : येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयातील १९ विद्यार्थ्यांची एक्सचेंजर या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाली आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव अॅड. चिमण डांगे व कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई यांनी दिली.
अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट कक्षाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या मुलाखतीची आणि यादरम्यान घेतल्या जाणाऱ्या विविध क्षमता चाचण्यांची तयारी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. समीर चौगुले, आकांक्षा बेलगी, श्रेयश माळी, अभिषेक सुर्वे, आशिष पवार, अंकिता मालकर, शंतनू क्षीरसागर, आकांक्षा चोपडे, प्राजक्ता पाटील, ऋतुजा माने, सत्यजित आवटी, पियुष बोंद्रे, सुलेमान शेख, स्वराज मुळे, प्रज्ञा मुके, रोहित शिंदे, आरती पवार, राहिदण्या शिंदे या विद्यार्थ्यांची निवड झाली.
महाविद्यालयाचे संचालक डॉ. विक्रम पाटील म्हणाले, मागील शैक्षणिक वर्षात इन्फोसिस कैप जेमिनी, आयबीएम, जेएसडब्ल्यू स्टील, एचपी, केपीटी, कुपर, पर्सिस्टंट, पोस्को, इओसीस यासह सुमारे १०० बहुराष्ट्रीय कंपन्यांत विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. कोरोना संकट काळातही डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ट्रेनिंग आणि प्लेसमेंट कक्ष नवनवीन कल्पना राबवून विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी ऑनलाईन मार्गदर्शन करत आहे, अशी माहिती कक्षाचे प्रमुख प्रा. सुहेल सय्यद यांनी दिली