शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणासाठी १९ हरकती; ११ ऑगस्टला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:35 IST

प्रभाग रचनेत भौगोलिक चुका झाल्याच्या लोकप्रतिनिधींच्या तक्रारी

सांगली : जिल्हा परिषदपंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट, गण प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या १९ हरकतींवर विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यापुढे मंगळवारी सुनावणी झाली. हरकती दाखल केलेल्या प्रतिनिधींनी म्हणणे मांडले, मात्र हरकतींवर लवकरच निर्णय दिला जाईल, असे विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले.पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्यापुढे झालेल्या सुनावणीवेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, महसूल उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, सर्व तहसीलदार आणि तक्रारदार उपस्थित होते.जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट आणि गणांची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली होती. गट आणि गणांवर १९ हरकती दाखल झाल्या होत्या. जिल्हा परिषद गटासाठी १६ व पंचायत समितीच्या गणांसाठी तीन हरकतींचा समावेश होता. आटपाडी तालुक्यात जिल्हा परिषद गट ६, गण १, जत तालुक्यात गट १, गण १, तासगावमध्ये गट २, कवठेमहांकाळ तालुक्यात एका गटासाठी, वाळवा तालुक्यात गट २, गण १, मिरज तालुक्यात जिल्हा परिषद गटासाठी ४ हरकती दाखल झाल्या होत्या.या हरकतींवर विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्यापुढे तक्रारदारांनी प्रभाग रचनेतील बदलास हरकत असल्याचे स्पष्ट केले. हरकतींसाठी गावांची फोडाफोड, चुकीच्या पद्धतीने जिल्हा परिषद गटांची रचना करणे, पंचायत समितीसाठी संपूर्ण गाव न घेता गावातील काही प्रभाग घेण्यात आले आहेत, याबाबत आक्षेप नोंदविण्यात आला. हरकतींवर तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले, मात्र निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला.

११ ऑगस्टला निर्णयगट आणि गणांसाठी दाखल झालेल्या हरकतींवर सुनावणी घेऊन निर्णय देण्यासाठी ११ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. अद्याप सहा दिवसांचा अवधी आहे, मात्र तत्पूर्वी विभागीय आयुक्तांकडून हरकतींवर निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे.