लसीचे १८ हजार डोस आले, ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना दुसरा डोस मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:28 IST2021-05-12T04:28:08+5:302021-05-12T04:28:08+5:30
सांगली : जिल्ह्यासाठी कोविशिल्डच्या १८ हजार लसी मंगळवारी रात्री उशिरा आल्या. त्यानुसार बुधवारी ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांचे लसीकरण पुन्हा सुरू ...

लसीचे १८ हजार डोस आले, ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना दुसरा डोस मिळणार
सांगली : जिल्ह्यासाठी कोविशिल्डच्या १८ हजार लसी मंगळवारी रात्री उशिरा आल्या. त्यानुसार बुधवारी ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांचे लसीकरण पुन्हा सुरू होईल. दुसरा डोस प्राधान्याने देण्यात येणार आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटाचे लसीकरण मात्र सुरू असून, उपलब्धतेनुसार व नोंदणीनुसार होईल.
मंगळवारी उपलब्ध लसीनुसार सर्वांनाच लस देण्यात आली. मात्र, ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांसाठीची लस संपली होती. दुपारी नव्याने साठा घेऊन निघालेली व्हॅन रात्री उशिरा पोहोचली. लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी सांगितले की, लसीचे वाटप बुधवारी सकाळी केले जाईल. त्यानंतर लसीकरण सुरू होईल. ही सर्व लस कोविशिल्ड आहे.
चौकट
मंगळवारचे लसीकरण असे
मंगळवारी दिवसभरात साडेपाच हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. १८ ते ४४ वयोगटासाठी ३१३१, ४५ ते ६० वयोगटासाठी ९३७ व ६० वर्षांवरील ज्येष्ठांना १३४१ डोस देण्यात आले. ग्रामीण भागात १७९४, निमशहरी भागात २५०९ व शहरी भागात १२४२ जणांना लस मिळाली. आजअखेर ६ लाख २० हजार ७ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.