वाळवा तालुक्यातील रस्त्यांसाठी १७.६५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:30 IST2021-09-24T04:30:56+5:302021-09-24T04:30:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : वाळवा तालुक्यातील रस्त्यांच्या कामाला गती देणार आहे. या रस्त्यांच्या कामासाठी १७ कोटी ६५ लाख ...

17.65 crore for roads in Valva taluka | वाळवा तालुक्यातील रस्त्यांसाठी १७.६५ कोटी

वाळवा तालुक्यातील रस्त्यांसाठी १७.६५ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : वाळवा तालुक्यातील रस्त्यांच्या कामाला गती देणार आहे. या रस्त्यांच्या कामासाठी १७ कोटी ६५ लाख निधी मंजूर केला आहे, असे मत पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

वाळवा तालुक्यातील आष्टा, गोटखिंडी, ढवळी व भडकंबे येथील रस्ता कामाचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील, अप्पर तहसीलदार दीक्षांत देशपांडे, माजी संचालक नारायण पाटील, नगराध्यक्षा स्नेहा माळी, माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील, दिलीपराव वग्याणी, संचालक विराज शिंदे, माणिक शेळके, संग्राम फडतरे, रघुनाथ जाधव, प्रकाश रुकडे, शिवाजी ढोले, शिवाजी चोरमुले, अर्जुन माने, अनिल पाटील, संग्राम जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: 17.65 crore for roads in Valva taluka