उमेद ग्रुपच्या रक्तदान शिबिरात १७१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:31 IST2021-08-14T04:31:56+5:302021-08-14T04:31:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कुपवाड : कुपवाड एमआयडीसीमधील उमेद ग्रुपतर्फे छाया नेमिचंद मालू यांच्या ६८व्या जयंतीनिम्मित आयोजित रक्तदान शिबिरात १७१ ...

उमेद ग्रुपच्या रक्तदान शिबिरात १७१
लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : कुपवाड एमआयडीसीमधील उमेद ग्रुपतर्फे छाया नेमिचंद मालू यांच्या ६८व्या जयंतीनिम्मित आयोजित रक्तदान शिबिरात १७१ दात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात उमेद ग्रुपच्या कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
उमेद ग्रुप व त्यांचे कर्मचारी अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन सामाजिक बांधिलकी कायम जोपासत आहेत. कोरोनाच्या या कालखंडात साथीच्या रोगामुळे रक्ताची अत्यंत निकड असल्यामुळे उमेद ग्रुपमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन उमेद ग्रुपचे अध्यक्ष नेमिचंद मालू, सुभाष मालू, नितीन मालू, सतीश मालू, गणेश मालू, रवी मालू, अक्षय मालू, केशव मालू यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरास कुपवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांनी भेट दिली. सिध्दिविनायक रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी जितेश पत्की, हिंदकेसरी प्रकाशबापू पाटील रक्तपेढीचे डॉ. मुजावर, डॉ. अनमोल मोरे, डॉ. पकंज बनसोडे व कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिराचे काम पाहिले. शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी उमेद ग्रुपचे धनाजी पवार, संतोष माने, स्वप्नील काटू, विनायक माने, कल्लाप्पा पडसलगीकर, लक्ष्मण पवार, राजू हणभर, राजू वळवडे आदींनी प्रयत्न केले.
फोटो : येणार आहे.
ओळ : कुपवाडमध्ये उमेद ग्रुपतर्फे छाया नेमिचंद मालू यांच्या ६८व्या जयंतीनिमित आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना सतीश मालू यांच्या हस्ते प्रमाणपत्र दिले. यावेळी केशव मालू, जितेश पत्की उपस्थित होते.