शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय नौदलात भरतीच्या आमिषाने १७ जणांची फसवणूक; कवठेमहांकाळमध्ये गुन्हा दाखल 

By घनशाम नवाथे | Updated: December 12, 2024 20:49 IST

फसवणूक करणारा परप्रांतीय माजी सैनिक...

सांगली : भारतीय नौदलात भरती करण्याचे आमिष दाखवून १७ तरूणांची १३ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत बिहारमधील संशयित राहुल कुमार (रा. पोसवन, जि. आरा) याच्याविरुद्ध कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राहुल कुमार याने नौदलात कार्यरत असताना ही फसवणूक केली आहे. सध्या तो निवृत्त झाला असून ‘नॉट रिचेबल’ झाला आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातील काही तरुण भारतीय नौदलात भरती होण्यासाठी प्रयत्न करत होते. मार्च २०२२ मध्ये भरतीसाठी काही तरुण मुंबईत भरतीसाठी गेले होते. तेथे नौदलात कार्यरत असलेल्या राहुल कुमार याने तरुणांशी संपर्क साधला. नौदलात ग्रुप ‘सी’ मध्ये भरती करतो, असे आमिष दाखवले. राहुल कुमार नौदलातच असल्यामुळे तरुणांना नोकरीबाबत खात्री पटली. मुंबईतून आल्यानंतर भरतीसाठी खरशिंग येथील सागर सुभाष मोहिते (वय २३ वर्षे) व त्याचे सहकारी तेजस दत्तात्रय पाटील, उत्तम सदानंद कोरे, प्रतीक भरत माळी, साईराज माणिक पाटील, आशिष लक्ष्मण पाटील, श्रेयस चव्हाण, केदार लाड यांच्याकडून राहुल कुमार याने ऑनलाइन व रोखीने ७ लाख रुपये घेतले, तसेच अभिजीत शिंदे, त्याचे सहकारी ज्ञानेश्वर शिंदे, शहाजी खरात, संतोष शिंदे, भीमराव ओले, शिवराज पाटील, अक्षय ओलेकर, सुनील लोखंडे, युवराज शिंदे यांच्याकडून ६ लाख ५५ हजार रुपये ऑनलाइन व रोखीन घेतले. एकूण १३ लाख ५५ हजार रुपये घेतले. मार्च २०२२ ते फेब्रुवारी २०२४ पर्यंत हा प्रकार घडला.पैसे घेतल्यानंतर तरुणांनी नियुक्तीचे पत्र मिळण्यासाठी तरुणांनी राहुल कुमार याच्याकडे तगादा लावला; परंतु त्याने टोलवाटोलव केली. आर्थिक फसवणूक झाल्याचे तरुणांना लक्षात आल्यानंतर घेतलेले पैसे परत मिळावे यासाठी तगादा लावला; परंतु राहुलकुमारकडून प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या काही दिवसांपासून तो ‘नॉट रिचेबल’ झाला. त्यामुळे बुधवार, दि.११ रोजी सागर मोहिते याने संंशयित राहुल कुमार याच्याविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक विनायक मसाळे तपास करत आहेत.फसवणूक केली अन् निवृत्त झालराहुल कुमार याने नौदलात कार्यरत असताना बेरोजगार तरुणांना भरतीचे आमिष दाखवले. तो नौदलात असल्यामुळे विश्वास बसला. त्यामुळे त्याला रक्कम दिली; परंतु रक्कम घेतल्यानंतर तो निवृत्त झाला आहे. त्यामुळे कवठेमहांकाळ पोलिसांना बिहारमध्ये जाऊन त्याचा शोध घ्यावा लागणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस