कामेरीत दोन दिवसांत १७ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:27 IST2021-05-11T04:27:54+5:302021-05-11T04:27:54+5:30

कामेरी : कामेरीत सोमवारी पुन्हा १२ जण बाधित झाले. रविवारी पाच जण बाधित झाले होते. त्यामुळे दोन दिवसांत १७ ...

17 corona in two days in Kameri | कामेरीत दोन दिवसांत १७ कोरोनाबाधित

कामेरीत दोन दिवसांत १७ कोरोनाबाधित

कामेरी : कामेरीत सोमवारी पुन्हा १२ जण बाधित झाले. रविवारी पाच जण बाधित झाले होते. त्यामुळे दोन दिवसांत १७ जण बाधित झाल्याने एकूण रुग्णांचा आकडा १९६ वर पोहोचला आहे.

कामेरीत आजअखेर १९६ बाधित झाले आहेत. चार जणांचा मृत्यू झाला आहे. कामेरीत सध्या ११३ सक्रिय रुग्ण असून त्यापैकी काही रुग्णांवर कराड व इस्लामपूर येथे कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ७९ कोरोनामुक्त झाले आहेत. सोमवारी कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ५५ अँटिजन टेस्ट करण्यात आल्या. त्यात १२ जण बाधित दिसून आले. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. ग्रामविकास अधिकारी आनंदराव पवार व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिवटे यांनी नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: 17 corona in two days in Kameri