जिल्ह्यात १६ नवे रुग्ण, ३१ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:24 IST2020-12-23T04:24:30+5:302020-12-23T04:24:30+5:30

सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. मंगळवारी दिवसभरात १६ नवे रुग्ण आढळले. दरम्यान, दिवसभरात ...

16 new patients in the district, 31 corona free | जिल्ह्यात १६ नवे रुग्ण, ३१ जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात १६ नवे रुग्ण, ३१ जण कोरोनामुक्त

सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. मंगळवारी दिवसभरात १६ नवे रुग्ण आढळले. दरम्यान, दिवसभरात एकाचाही मृत्यू झाला नाही, तर ३१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

महापालिका क्षेत्रात मंग‌ळवारी सांगलीत दोन तर मिरजेत एका रुग्णाची नोंद झाली. आटपाडी, तासगाव, जत, कडेगाव तालुक्यात प्रत्येकी २, खानापूर तालुक्यात ३ तर पलूस व शिराळा तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळले. वाळवा, कवठेमहांकाळ तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही.

दिवसभरात आरटीपीसीआरच्या ३६९ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ५ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. अँटिजेनच्या १०५० चाचण्यांत ११ रुग्ण सापडले. सध्या ३८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ऑक्सिजनवर २७, हाय फ्लो नेझल ऑक्सिजनवर ३, तर नाॅन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर ७ रुग्ण आहेत.

चौकट

मंगळवारी दिवसभरात...

आजचे रुग्ण : १६

उपचाराखालील रुग्ण : २०८

आजअखेर बरे झालेले रुग्ण : ४५,४८३

मृत्यू : १७२७

आजअखेरचे एकूण रुग्ण : ४७४१८

चिंताजनक : ३८

चौकट

रुग्णसंख्या अशी

सांगली : २

मिरज : १

आटपाडी : २

कडेगाव : २

खानापूर : ३

पलूस : १

तासगाव : २

जत : २

कवठेमहाकांळ : ०

मिरज : ०

शिराळा : १

वाळवा : ०

Web Title: 16 new patients in the district, 31 corona free