जिल्ह्यात १६ नवे रुग्ण; १० जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:29 IST2021-02-05T07:29:37+5:302021-02-05T07:29:37+5:30
सांगली : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात नवे १६ कोरोना रुग्ण आढळून आले, तर १० जणांनी कोरोनावर मात केली. सध्या १२० ...

जिल्ह्यात १६ नवे रुग्ण; १० जण कोरोनामुक्त
सांगली : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात नवे १६ कोरोना रुग्ण आढळून आले, तर १० जणांनी कोरोनावर मात केली. सध्या १२० रुग्ण उपचाराखाली असून त्यातील ३८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
महापालिका क्षेत्रात मंगळवारी सांगलीत ५, तर मिरजेत ३ रुग्णांची नोंद झाली. मिरज व खानापूर तालुक्यात प्रत्येकी दोन, तर जत तालुक्यात तीन व वाळवा तालुक्यात १ रुग्ण आढळून आला. आटपाडी, कडेगाव, तासगाव, शिराळा, कवठेमहांकाळ व पलूस या सहा तालुक्यांत एकही रुग्ण आढळला नाही. दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
दिवसभरात आरटीपीसीआरच्या १९७ चाचण्या करण्यात आल्या. त्यात चार पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. अँटिजेनच्या ६५१ चाचण्यांत १२ रुग्ण सापडले. सध्या ३८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ऑक्सिजनवर ३०, हाय फ्लो नेझल ऑक्सिजनवर ३, तर नाॅन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर ५ रुग्ण आहेत.
चौकट
दिवसभरात नवे रुग्ण : १६
उपचाराखालील रुग्ण : १२०
बरे झालेले रुग्ण : ४६,२५२
आजअखेर मृत्यू : १७४९
एकूण रुग्ण : ४८,१२१