भिवर्गीत द्राक्षबाग कोसळून १६ लाखांंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:50 IST2021-03-13T04:50:14+5:302021-03-13T04:50:14+5:30

फोटो ओळ : भिवर्गी (ता.जत) येथील शेतकरी काशिनाथ मल्लाप्पा सुतार यांची वाऱ्यामुळे बाग कोसळून १६ लाखांंचे नुकसान झाले. लोकमत ...

16 lakh loss due to collapse of vineyards | भिवर्गीत द्राक्षबाग कोसळून १६ लाखांंचे नुकसान

भिवर्गीत द्राक्षबाग कोसळून १६ लाखांंचे नुकसान

फोटो ओळ : भिवर्गी (ता.जत) येथील शेतकरी काशिनाथ मल्लाप्पा सुतार यांची वाऱ्यामुळे बाग कोसळून १६ लाखांंचे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

संख : भिवर्गी (ता. जत) येथील शेतकरी काशिनाथ मल्लाप्पा सुतार यांची द्राक्ष काढण्‍यासाठी आलेली बाग वाऱ्यामुळे कोसळून जमीनदोस्त झाली. यामध्ये १६ लाखांंचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी १० झाली.

भिवर्गी येथील भिवर्गी फाट्यापासून दोन किलोमीटर अंतरावर भिवर्गी-संख रस्त्यालगत शेतकरी काशिनाथ सुतार यांची जमीन आहे. त्यांनी तीन एकर क्षेत्रामध्ये थाँमसन सिडलेस द्राक्षाचे उत्पन्न घेतले आहे. सध्या द्राक्ष विक्रीसाठी येणारे होती. बागेत सुमारे ५५ टन द्राक्षे होते.

बाजारभावाप्रमाणे जवळपास पंधरा ते सोळा लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते; परंतु अचानक जोराचा वारा बागेत घुसल्याने मांडवाचे तार तुटून खांब कोसळले आणि द्राक्ष बाग जमीनदोस्त झाली.

द्राक्षासह झाडांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पोटच्या पोराप्रमाणे काबाडकष्ट करून द्राक्षबाग जगवली होती. डोळ्यासमोर द्राक्ष बाग कोसळल्याने काशिनाथ सुतार यांना मोठा धक्का बसला आहे.

कृषी अधिकारी एस. एम. कोष्टी व तलाठी बाळासाहेब जगताप यांनी पंचनामा केला आहे.

यावेळी सरपंच मदगोंडा सुसलाद, उपसरपंच बसगोंडा चौगुले, पोलीस पाटील श्रीशैल चौगुले, सोसायटी अध्यक्ष श्रीकांत बिराजदार, कोतवाल श्रीशैल धंदरगी व शेतकरी उपस्थित होते.

चाैकट

नुकसानभरपाई द्या

द्राक्षेबागेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी काशिनाथ सुतार यांनी केली आहे.

Web Title: 16 lakh loss due to collapse of vineyards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.