शिरसगावात १६ वयोवृद्ध मातांचा गौरव
By Admin | Updated: September 24, 2015 00:03 IST2015-09-23T23:23:51+5:302015-09-24T00:03:41+5:30
शिवशक्ती मंडळाचा उपक्रम : ग्रामस्थ भारावले

शिरसगावात १६ वयोवृद्ध मातांचा गौरव
कडेगाव : शिरसगाव (ता. कडेगाव) येथील शिवशक्ती गणेश मंडळाने गावामधील ८० वर्षांवरील १६ वयोवृद्ध आदर्श मातांचा गौरव केला. या सर्व मातांचा सत्कार सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी सर्व ग्रामस्थ भारावले होते.मोहनराव कदम म्हणाले, शिवशक्ती मंडळाने वयोवृद्ध मातांचा गौरव समारंभ आयोजित करून एक नवा आदर्श घालून दिला आहे. माझ्या राजकीय कारकीर्दीत असा स्तुत्य उपक्रम मी कधीही पाहिला नाही.यावेळी किसाबाई शामराव सपकाळ, जिजाबाई रावजी यादव, इंदूबाई पांडुरंग मांडके, गोकुळा किसन पवार, अकुबाई यशवंत सकटे, यशोदा धोंडीराम घुटुकडे, अनुसया रघुनाथ जाधव, नर्मदा दादू जाधव, खाशीबाई दादासाहेब पवार, भागीर्थी अण्णा मांडके, गंगूबाई धोंडीराम मांडळे, मुक्ताबाई ज्ञानदेव मांडके, हिराबाई गणपती मांडके, पार्वती परशुराम मांडके, यसुबाई रामचंद्र मांडके, चांदबी आयुब रिकीबदार अशा १६ वृद्ध मातांचा सत्कार करण्यात आला.सरपंच सतीश मांडके यांनी स्वागत, नामदेव यादव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वैशालीताई कदम, यशोदा कदम, लायन्स क्लब कऱ्हाडचे खजिनदार संदीप पवार, माजी उपसरपंच संभाजी मांडके, रामचंद्र घुटुकडे, विजय मांडके, संदीप निकम, बाळासाहेब मांडके, सागर मांडके उपस्थित होते. अरुण मांडके यांनी आभार मानले. (वार्ताहर)