आटपाडी तालुक्यातील १६ क्रशर शासकीय दप्तरी बंद, प्रत्यक्षात सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST2021-05-31T04:20:15+5:302021-05-31T04:20:15+5:30
पिंजारी म्हणाले, आटपाडी तालुक्यात गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन व स्टोन क्रशर व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तरीही तहसील ...

आटपाडी तालुक्यातील १६ क्रशर शासकीय दप्तरी बंद, प्रत्यक्षात सुरु
पिंजारी म्हणाले, आटपाडी तालुक्यात गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन व स्टोन क्रशर व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तरीही तहसील कार्यालयाने सोयीस्कररित्या कानाडोळा केला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर तहसीलदार सचिन मुळीक यांनी वाळू उपसा करणाऱ्या व बेकायदेशीररित्या व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली. परंतु नव्याचे नऊ दिवस संपल्यानंतर तालुक्यात पुन्हा मागचे दिवस पुढे येऊन वाळू उपसा, क्रशर व्यवसाय, अवैध धंदे जोरात सुरू आहेत. तहसील कार्यालयाशी संपर्क केला असता तालुक्यातील १६ बंद व सील असल्याची माहिती दिली आहे. प्रत्यक्षात ही स्टोन क्रशर शासन नियम आणि अटी नियम व शर्तींचे पूर्णपणे उल्लंघन करून सुरू आहेत. स्टोन क्रशर नियम व अटींचे पालन न करताच सुरु आहेत. तहसीलच्या रेकॉर्ड नुसार बंद असलेल्या व प्रत्यक्षात सुरू असलेल्या स्टोन क्रशरनी आजवर केलेल्या उत्खननाची मोजणी करून शासनाच्या नियमाप्रमाणे दंड आकारणी करून फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत. स्टोन क्रशर व्यवसायाला पाठीशी घालणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रकाश गायकवाड, अभिजित सरगर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.