शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरच्या १८८ कर्जदारांकडे १६ कोटींचे व्याज थकीत, सांगली प्राथमिक शिक्षक बँकेच्या अडचणींत वाढ 

By अशोक डोंबाळे | Updated: May 20, 2024 18:41 IST

सांगली : येथील प्राथमिक शिक्षक बँकेचे सोलापूर जिल्ह्यातील १८८ शिक्षक कर्जदारांकडे केवळ व्याज १६ कोटी रुपयांचे थकीत आहे. तत्कालीन ...

सांगली : येथील प्राथमिक शिक्षकबँकेचेसोलापूर जिल्ह्यातील १८८ शिक्षक कर्जदारांकडे केवळ व्याज १६ कोटी रुपयांचे थकीत आहे. तत्कालीन शिक्षक समितीच्या या कारभारामुळे शिक्षक बँकेचा कारभार सुरळीत आणताना खूप अडचणी येत आहेत. तरीही बँकेला या आर्थिक वर्षात पाच कोटी ८० लाख ५८ हजार रुपयांचा नफा झाला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. गतवर्षीपेक्षा दोन कोटी ७० लाख रुपयांची नफा घटला आहे.विनायक शिंदे म्हणाले, शिक्षक समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाने सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांना ९० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. यापैकी १८८ कर्जदारांकडे केवळ ‘एनपीए’चे व्याजच १६ कोटी रुपयांचे थकीत आहे. यासह ठेवीवरील व्याजदर ६ टक्क्यांवरून ८ टक्क्यांपर्यंत केला आहे. ठेवींवरील व्याजदर वाढविताना कर्जाचा व्याजदर पूर्वीप्रमाणेच ठेवला आहे. यामुळे गतवर्षीपेक्षा यावर्षी दोन कोटी ७० लाख रुपयांनी नफा घटला आहे. गतवर्षीच्या आर्थिक वर्षात आठ कोटी ५० लाख रुपयांचा नफा झाला होता; पण यावर्षी पाच कोटी ८० लाख ५८ हजार रुपयांचा नफा झाला आहे. बँकेचा नेट एनपीए १.७० टक्के, तर ग्रॉस एनपीए ४.४० टक्के झाला आहे. एनपीए कमी करण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी स्टेशनरी, छापाई खर्चात कपात केली आहे. कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली; पण बोनस, बक्षीस, पगार देण्याची पद्धती बंद केली आहे. यामुळे बँकेचे जवळपास एक कोटी रुपये वाचणार आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यातील कर्जदारांची थकीत रक्कम वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. वर्षभरात निश्चित थकबाकीचा आकडा कमी करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यावेळी शिक्षक बँकेच्या उपाध्यक्षा अनिता काटे, संचालक अविनाश गुरव, शब्बीर तांबोळी, मुश्ताक पटेल, तानाजी खोत, हंबीरराव पवार, महादेव हेगडे, सलीम मुल्ला, गांधी चौगुले आदी उपस्थित होते.

सभेत थकबाकीदारांच्या नावांचे वाचन करणारप्राथमिक शिक्षक बँकेकडील थकबाकीदारांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी थकबाकीदारांच्या सर्व नावांचे शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत वाचनच करणार आहे, असेही विनायक शिंदे म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीTeacherशिक्षकbankबँकSolapurसोलापूर