पंधरा मिनिटात महासभा तहकूब

By Admin | Updated: June 20, 2014 00:36 IST2014-06-20T00:36:03+5:302014-06-20T00:36:28+5:30

मान्यवरांना आदरांजली : सोमवारी सभा होणार

In the 15th minute, | पंधरा मिनिटात महासभा तहकूब

पंधरा मिनिटात महासभा तहकूब

सांगली : मागील काही दिवसांत निधन पावलेल्या मान्यवरांना आदरांजली वाहून महानगरपालिकेची महासभा अवघ्या पंधरा मिनिटांत तहकूब करण्यात आली. महासभेचे कामकाज सुरू होताच नगरसेवक गौतम पवार यांनी विषयपत्रिका बाजूला ठेवून नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा घ्यावी, असा मुद्दा उपस्थित केला. त्याकडे दुर्लक्ष करून महासभेचे कामकाज पुढे सुरू झाले आणि मान्यवरांना आदरांजली वाहण्यात आली. पुढील महासभा सोमवार, दि. २३ रोजी सकाळी ११ वाजता होणार असल्याचे महापौरांनी जाहीर केले.
आज महासभा सुरू झाल्यावर भाजपचे नगरसेवक आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. प्रथम नागरी प्रश्नांवर चर्चा करावी, अशी त्यांची मागणी होती. यावेळी त्यांनी आणलेले कापडी फलकही सभागृहात झळकवले. विषयपत्रिकेवर नागरिकांच्या हिताचा कोणताच विषय नसून, महापालिकेत कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची मिलीभगत झाल्याचा आरोपही नगरसेवक गौतम पवार यांनी केला. भाजपच्या विरोधाला न जुमानता सभागृहाचे कामकाज पुढे चालविण्यात आले.
यानंतर केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे, माजी आ. व्यंकाप्पा पत्की, माजी उपमहापौर दादासाहेब लांडगे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी धोंडिराम बापू माळी, तमाशापटू अंकुश खाडे, पत्रकार अनिल कांबळे यांच्यासह मागील काही दिवसांत निधन पावलेल्या व्यक्तींना आदरांजली वाहण्यात आली. यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय बजाज यांनी महापौर कांचन कांबळे यांच्याकडे मान्यवरांना आदरांजली म्हणून सभागृह काही काळ तहकूब करावे, अशी विनंती केली. त्याला सूचक अनुमोदन नगरसेवक राजेश नाईक यांनी दिले. (प्रतिनिधी)

Web Title: In the 15th minute,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.