शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

उमदी आश्रमशाळेत १५४ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; रूग्णालयात उपचार सुरू

By अशोक डोंबाळे | Updated: August 28, 2023 10:36 IST

जि.प. अध्यक्षा होर्तीकर यांच्या मुलाच्या एका कार्यक्रमातील जेवणातून झाली विषबाधा

अशोक डोंबाळे, सांगली: उमदी (ता. जत, जि. सांगली) येथील आश्रमशाळेतील १५४ विद्यार्थ्यांना रविवारी जेवणातून विषबाधा झाली असून सर्व विद्यार्थ्यांना जत ग्रामीण रुग्णालय, कवठेमहांकाळ, माडग्याळ, मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. उमदी (ता. जत, जि. सांगली) येथील समता अनुदानित आश्रमशाळेतील १५४ विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांच्या मुलाच्या एका कार्यक्रमातील जेवणातून रविवारी (२७) रात्री उशिरा विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय, माडग्याळ व जत येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तेथे विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चांगली आहे.

एकूण १५४ रुग्णांपैकी मिरज शासकीय रुग्णालय २६, जत ग्रामीण रुग्णालय ५७, कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालय ४१, माडग्याळ ग्रामीण रुग्णालय २० आणि आश्रम शाळेत १० विद्यार्थीं असे १५४ विद्यार्थ्यांवर उपचार चालू आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली. त्यांची प्रकृती चांगली आहे. उर्वरित सर्व रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथील रुग्णालयात पाठविण्यात आलेले आहेत.

माडग्याळ, जत व मिरज तिन्ही ठिकाणी डॉक्टरांना तात्काळ व सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घटनेची माहिती व दखल घेतली असून, विद्यार्थ्यांच्या उपचारांत कोणतीही उणीव ठेवू नये, अशा सूचना त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची यंत्रणा व जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिल्या आहेत. तसेच, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांना सदर घटनेची संपूर्ण चौकशी करून २४ तासांच्या आत अहवाल सादर करण्याच्या व दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीfood poisoningअन्नातून विषबाधाStudentविद्यार्थी