लाडेगावसाठी १५ लाखाचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:19 IST2021-06-29T04:19:08+5:302021-06-29T04:19:08+5:30
यामध्ये समाज मंदिराजवळील डीपी शिफ्ट करणे तसेच एसटी स्टँड चौकातील ३३ केव्ही लाईन शिफ्ट करणे तसेच एसटी स्टँड चौकामध्ये ...

लाडेगावसाठी १५ लाखाचा निधी
यामध्ये समाज मंदिराजवळील डीपी शिफ्ट करणे तसेच एसटी स्टँड चौकातील ३३ केव्ही लाईन शिफ्ट करणे तसेच एसटी स्टँड चौकामध्ये नवीन डीपी बसविणे, बॉक्सपेटी बदलणे, पोल शिफ्ट करणे, खराब पोल बदलणे, स्पेसर बदलणे आदी कामांचा समावेश आहे. सरपंच रणधीर पाटील यांनी उपकार्यकारी अभियंता एम. बी. धाडवे यांच्याकडे गावातील विकास कामे होण्यासाठी मागणी केली होती. त्या मागणीचा विचार करून सहायक अभियंता एम. एच. रसाळ, उपकार्यकारी अभियंता एम. बी. धाडवे, कार्यकारी अभियंता कारंडे यांचा सहकार्याने सर्व कामांचे प्रस्ताव सादर करून जिल्हा नियोजनला पाठविले. यानंतर जिल्हा नियोजनामधून १५ लाख रुपये निधी मंजूर झाला. या निधीसाठी आ. मानसिंगराव नाईक, खा. धैर्यशील माने व सरपंच रणधीर पाटील यांनी पाठपुरावा केला.