शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

शिवांजली व ऐश्वर्यासह १५ भारतीय विद्यार्थी पोहोचले हंगेरीत, लवकरच मायदेशी परतणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 12:18 IST

आकाशातून घिरट्या घालणारी विमाने आणि बॉम्बचे कानठीळ्या बसणारे आवाज ऐकून अंगाचा थरकाप उडत होता.

प्रताप महाडीककडेगाव : यूक्रेनच्या खारकिव्ह शहरातून धाडसाने बाहेर पडत हंगेरी बॉर्डरच्या दिशेने निघालेले  शिवांजली यादव व ऐश्वर्या पाटील यांच्यासह १५ भारतीय विद्यार्थी हंगेरीची राजधानी असलेल्या बुडापेस्ट या शहरात सुरक्षित  पोहोचले  आहेत. तब्बल १५५० किमी अंतराच्या रेल्वे प्रवासानंतर ते बुडापेस्ट शहरात पोहोचले.कडेगाव तालुक्यातील कडेपुर येथील शिवांजली दत्तात्रय यादव व हिंगणगाव खुर्द येथील ऐश्वर्या सुनील पाटील या दोघी युक्रेनमधील खारकिव्ह शहरात आडकल्या होत्या. मात्र रशियाचे हल्ले तीव्र झाल्याने त्यांच्यासह १५ भारतीय विद्यार्थ्यांनी धाडसाने खारकिव्ह शहर सोडले आणि जीव मुठीत घेऊन  हंगेरीत पर्यंतचा थरारक प्रवास केला. आम्ही सुरक्षित बुडापेस्ट शहरात सुरक्षित पोहोचलो आहे असे शिवांजली यादव व ऐश्वर्या पाटील यांनी लोकमतशी बोलताना  सांगितले.शिवांजली म्हणाली, खारकिव्ह येथून मंगळवारी सकाळी जीव मुठीत घेऊन आम्ही  बाहेर  पडलो. रेल्वेने प्रवास करीत असताना युक्रेनची राजधानी असलेल्या किव्ह पासून पुढे जाई पर्यंत भीतीचे वातावरण होते. रशियाकडून युक्रेन मधील खारकिव्ह आणि राजधानी असलेल्या किव्ह शहरावर हल्ले सुरू आहेत. अशा स्थितीत किव्ह शहरातून  रेल्वे पुढे जाईपर्यंत मनात खूप भीती  होती. आकाशातून घिरट्या घालणारी विमाने आणि बॉम्बचे कानठीळ्या बसणारे आवाज ऐकून अंगाचा थरकाप उडत होता.मात्र आम्ही एकमेकांना दिलासा देत धाडसाने तो थरारक प्रवास करीत होतो. मंगळवारी सायंकाळी  लिव्ह रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचल्यावर तेथे उतरून या  काही तास पुढील रेल्वेची प्रतीक्षा करीत होतो. लिव्ह मध्येही हल्ले सुरू होते त्यामुळे भीती कायम होती. तेथून काही वेळाने  दुसऱ्या रेल्वेने युक्रेनमधील चॉप शहराकडे प्रवास सुरु केला आणि आम्हाला दिलासा मिळाला. चॉप रेल्वे स्थानकात उतरल्यावर  थोडेसे सुरक्षित वातावरण वाटले.युक्रेनमधील चॉप  शहरापासून  २४५ किमी अंतरावर हंगेरी बॉर्डरवर रेल्वे पोहचल्यावरच आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला. रात्री उशिरा बुडापेस्ट या शहरात आम्ही पोहोचलो. आता आम्ही  भारतीय दूतावास व भारत सरकारच्या मदतीने सुरक्षित मायदेशी पोहोचणार आहोत  असा विश्वास शिवांजली यादव व ऐश्वर्या पाटील यांनी व्यक्त केला.

टॅग्स :SangliसांगलीRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया