शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

ठिबक सिंचनचे १५ कोटी थकीत, सांगली जिल्ह्यातील ४७३० शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 16:29 IST

लाभार्थी आर्थिक संकटात

सांगली : केंद्र व राज्य शासनाकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ‘तुषार’ व ‘ठिबक’ सिंचन योजना राबवली जात आहे. जिल्ह्यातील सात हजार शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेत लाभ घेतला. त्यापैकी ३८७ शेतकऱ्यांना ९६ लाखांचे अनुदान मिळाले. जिल्ह्यातील अद्याप चार हजार ७३० शेतकऱ्यांचे ठिबक सिंचनचे १५ कोटी अनुदान थकीत आहे. अनुदानास उशीर झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.शेतसाठी पाण्याचा काटेकोरपणे वापर व्हावा आणि सिंचन क्षेत्रात वाढ होण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा संरक्षित वापर करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत ८० टक्के अनुदानावर ठिबक, तुषार संच पुरवण्यात येतात.‘महाडीबीटी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांची सोडत (लॉटरी) पद्धतीने निवड केली जाते. निवड झाल्यानंतर खरेदी प्रक्रिया होते. त्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित करण्यात येते. हे अनुदान केंद्र व राज्य शासन वितरित करते. मात्र, काही महिन्यांपासून या योजनेच्या अनुदानाला ‘ब्रेक’ लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.

जिल्ह्यातील सात हजार सात शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेत लाभ घेतला होता. त्यापैकी दोन हजार २७० शेतकऱ्यांना चार कोटी रुपयांचे अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग केले आहे; पण चार हजार ७३० शेतकऱ्यांसाठी १५ कोटी रुपयांच्या अनुदानाची गरज आहे. शेतकऱ्यांनी ठिबक संच विक्रेत्याचे पैसे पतसंस्था, बँकांडून घेऊन दिले आहेत; परंतु अनुदानाचे पैसे वेळेत न मिळाल्यामुळे कर्जाचे व्याज वाढत आहे.अजूनही अनुदान न मिळाल्याने संबंधित शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, याकडे लक्ष लागले होते. निवडणुका होऊन दोन महिने झाले तरी ठिबक सिंचनाचे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही. यामुळे शेतकरी कृषी विभागाकडे ठिबक सिंचनाच्या अनुदानासाठी फेऱ्या मारत आहेत.

चार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमाशासनाकडून ठिबक सिंचनासाठी चार कोटी रुपयांचे अनुदान मागील महिन्यात मिळाले आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग केली आहे. उर्वरित १५ कोटी रुपयांचे अनुदानाची शासनाकडे मागणी केली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितली.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी