हुतात्मा बझारच्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के पगारवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:55 IST2021-09-02T04:55:20+5:302021-09-02T04:55:20+5:30
वाळवा : हुतात्मा बझार ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. कुठल्याही संस्थेचे अस्तित्व हे त्या संस्थेच्या ताळेबंदावरून कळते. बझारचा २५ वर्षांचा ...

हुतात्मा बझारच्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के पगारवाढ
वाळवा : हुतात्मा बझार ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. कुठल्याही संस्थेचे अस्तित्व हे त्या संस्थेच्या ताळेबंदावरून कळते. बझारचा २५ वर्षांचा आलेख हा चढताच आहे. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त बझारच्या सर्व कर्मचा-यांना १५ ऑगस्टपासून १५ टक्के पगा वाढ केल्याचे संस्थापक वैभव नायकवडी यांनी जाहीर केले.
हुतात्मा बझारच्या २५ व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत नायकवडी बोलत होते. बझारचे अध्यक्ष दिनकर बाबर अध्यक्षस्थानी होते. बझारच्या कार्यवाह नंदिनी नायकवडी, उपाध्यक्ष संपतराव पाटील, विठ्ठल चौगुले, आनंदराव सूर्यवंशी, राजेंद्र निकम, कांचन वाजे, अर्चना गुंजवटे, मीनाक्षी जाधव, मारुती चव्हाण, सरव्यवस्थापक संजय दळवी प्रमुख उपस्थित होते.
नायकवडी म्हणाले, ग्राहकांच्या आवडी-निवडी आज बदलल्या आहेत. ऑनलाईन मार्केटिंग जोरात सुरू आहे. त्यामुळे विस्तार महत्त्वाचा आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी नवीन शाखा काढण्यात येतील. ग्राहकांच्याही शाखा मागणीसाठी वारंवार विनंती हाेत आहे. कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर करू नये. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून संस्थेशी इमानदारीने काम केले, तर संस्थेची प्रगती होईल. परिस्थितीनुसार आपण नाही बदललो, तर प्रगतीसाठी अडथळा आहे, हे ओळखून चालावे.
सरव्यवस्थापक संजय दळवी यांनी विषयपत्रिकेचे वाचन व मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. अध्यक्ष दिनकर बाबर यांनी अहवाल वाचन केले. वितरण व्यवस्थापक प्रदीप पवार यांनी ताळेबंद पत्रके सादर केली.