शिराळा तालुक्यात १४९ नवीन कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:25 IST2021-05-22T04:25:19+5:302021-05-22T04:25:19+5:30
शिराळा : शिराळा तालुक्यात शुक्रवारी ४३ गावांमध्ये विक्रमी १४९ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मांगले ...

शिराळा तालुक्यात १४९ नवीन कोरोना रुग्ण
शिराळा : शिराळा तालुक्यात शुक्रवारी ४३ गावांमध्ये विक्रमी १४९ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
मांगले २१, सांगाव १७ या हॉटस्पॉट गावांत रुग्ण आढळून आले आहेत.
मांगले २१, सांगाव १७, देववाडी, पाचुम्बरी, पाडळी प्रत्येकी ८, येळापूर ७, चिखलवाडी, कांदे प्रत्येकी ६, बिऊर ५, कार्वे, कोकरूड, पाडळेवाडी, रेड प्रत्येकी ४, भागाईवाडी, मेणी, निगडी, पनुम्बरे वारून प्रत्येकी ३, भाटशिरगाव, चिंचोली, गिरजवडे, इंगरुळ, कणदूर, लादेवाडी , शिराळा, वीरवाडी, वाकुर्डे बुद्रुक प्रत्येकी २, आराळा, आंबेवाडी, अंत्री बुद्रुक, भटवाडी, चिखली, धामवडे, गुढे, जांभळेवाडी, काळूनद्रे, कापरी, करमाळे, लाडेगाव, मालेवाडी, खुजगाव, फुपिरे, सावर्डे, तडवळे प्रत्येकी १, असे रुग्ण आहेत.
एकूण ८६३ पॉझिटिव्ह रुग्ण असून गृहविलगीकरण कक्ष ७६० रुग्ण आहेत. शिराळा संस्था विलगीकरण कक्ष १३, उपजिल्हा रुग्णालय ४०, कोकरूड ग्रामीण रुग्णालय २५, स्वस्तिक कोविड सेंटर १९, मिरज कोविड रुग्णालय २, खाजगी रुग्णालय ४, असे रुग्ण उपचार घेत आहेत.