शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत पुणे विभागात वर्षभरात १४०४ वेळा आपत्कालीन साखळी खेचली; किती जण अटकेत अन् दंड वसूल..जाणून घ्या

By संतोष भिसे | Updated: May 12, 2023 17:43 IST

क्षुल्लक कारणांसाठी आपत्कालीन साखळीच‍ा गैरवापर टाळावा असे आवाहन रेल्वेने केले

मिरज : प्रवाशांकडून आपत्कालीन साखळी ओढून रेल्वे थांबविण्याच्या घटना वाढत आहेत. पुणे विभागात एप्रिल ते मार्च २०२३ या वर्षात १४०४ वेळा विनाकारण साखळी खेचून रेल्वे थांबविण्याचे प्रकार घडले. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करुन ११६४ जणांना अटक करण्यात आली. तीन लाख १९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. 

रेल्वेत आपत्कालीन कारणासाठी गाडी थांबवण्यासाठी साखळीचा पर्याय आहे. मात्र त्याचा गैरवापर सुरु आहे. स्थानकातून गाडी सुटत असताना प्रवासी पोहोचणे, थांबा नसलेल्या स्थानकांवर उतरणे किंवा चढणे अशा किरकोळ कारणांसाठी साखळी ओढून गाडी थांबवली जाते. त्यामुळे  गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होते. रेल्वे उशिरा धावल्याने प्रवाशांची गैरसोय होते. एखाद्या प्रवाशाच्या चुकीमुळे इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते.

पुणे विभागात प्रवाशांनी अनावश्यक साखळी ओढू नये यासाठी उदघोषणा केल्या जातात. रेल्वेत सूचना फलकही लावले आहेत. तरीही विनाकारण साखळी ओढण्याचे प्रकार थांबलेले किंवा कमी झालेले नाहीत. उलट अशा घटना वाढतच आहेत. किरकोळ व अनावश्यक कारणासाठी आपत्कालीन साखळीच‍ा वापर करणे रेल्वे कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी गाडी सुटण्यापूर्वी किमान अर्धा तास अगोदर रेल्वे स्थानकात पोहोचावे, क्षुल्लक कारणांसाठी आपत्कालीन साखळीच‍ा गैरवापर टाळावा असे आवाहन रेल्वेने केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीPuneपुणेrailwayरेल्वे