आटपाडी तालुक्यात १.४० कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:30 IST2021-09-12T04:30:06+5:302021-09-12T04:30:06+5:30
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील सर्व पंचायत समितीच्या सदस्यांना एक कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती पंचायत समितीच्या ...

आटपाडी तालुक्यात १.४० कोटींचा निधी
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील सर्व पंचायत समितीच्या सदस्यांना एक कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती पंचायत समितीच्या सभापती पुष्पा सरगर यांनी दिली.
१५ व्या वित्त आयोगातून आटपाडी तालुक्यातील विविध गावांमध्ये विकासकामांसाठी निधी मंजूर झाला आहे. पंचायत समितीच्या करगणी, शेटफळे, घरनिकी, कोठुळी, आटपाडी, दिघंची, नेलकरंजी, निंबवडे या आठ पंचायत समिती गणामध्ये सर्व सदस्यांना विकासकामासाठी निधी उपलब्ध झाला आहे.
सध्या सत्तर लाख रुपये कामाच्या मंजुरी प्राप्त झाली आहे. आमदार गोपिचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या सहकार्याने आटपाडी पंचायत समितीच्या सभापती पुष्पा जयवंत सरगर यांचे स्थानिक निधीतून निंबवडे पंचायत समिती गणातील गावांना नऊ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती सरगर यांनी दिली.
निबवडे पंचायत समिती गणाची विकासात्मक वाटचाल सुरू आहे. निबवडे पंचायत समिती गटातील उर्वरित गावातील विकास कामासाठी लवकरच निधी उपलब्ध होणार असून त्या गावातील विकासकामेही लवकरच सुरू करणार असल्याची माहिती सरगर यांनी दिली.