जिल्ह्यात १४ कोरोनाचे नवे रुग्ण; २७ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:23 IST2021-02-05T07:23:23+5:302021-02-05T07:23:23+5:30
सांगली : जिल्ह्यात रविवारी १४ जणांना कोरोनाचे निदान झाले. बाधितांची संख्या मर्यादित राहतानाच दिवसभरात कोरोनाने एकाही मृत्यूची नोंद झाली ...

जिल्ह्यात १४ कोरोनाचे नवे रुग्ण; २७ जण कोरोनामुक्त
सांगली : जिल्ह्यात रविवारी १४ जणांना कोरोनाचे निदान झाले. बाधितांची संख्या मर्यादित राहतानाच दिवसभरात कोरोनाने एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २७ जण कोरोनामुक्त झाले. तीन तालुक्यात एकाही नव्या रुग्णाची नोंद झाली नाही.
कोरोनाचा उतार कायम असतानाच बरे होणाऱ्यांचेही प्रमाण चांगले आहे. पलूस, शिराळा आणि वाळवा तालुक्यात एकही नवीन रुग्ण आढळला नाही.
आरोग्य विभागाच्या वतीने रविवारी दिवसभरात आरटीपीसीआर अंतर्गत ३५१ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली त्यात ८ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ४४१ चाचण्यांमधून ७ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
जिल्ह्यातील पाच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १४३ रुग्णांपैकी ३६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ३३ जण ऑक्सिजनवर तर तिघेजण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. व्हेंटिलेटरवर उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. बेळगाव जिल्ह्यातील एकास काेरोनाचे निदान झाले आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४८०१७
उपचार घेत असलेले १४३
कोरोनामुक्त झालेले ४६१२८
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७४६
रविवारी दिवसभरात
सांगली २
मिरज १
आटपाडी १
जत २
कडेगाव ३
कवठेमहांकाळ १
खानापूर २
मिरज तालुका १
पलूस ०
शिराळा ०
तासगाव १
वाळवा ०