इस्लामपूर येथील माध्यमिक शाळा सेवक संस्थेचा १४ टक्के लाभांश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:29 IST2021-09-18T04:29:00+5:302021-09-18T04:29:00+5:30
इस्लामपूर : वाळवा तालुका माध्यमिक शाळा सेवकांच्या पतसंस्थेच्यावतीने सभासदांना १४ टक्के लाभांश आणि भेटवस्तू देण्यात येणार असल्याची घोषणा अध्यक्ष ...

इस्लामपूर येथील माध्यमिक शाळा सेवक संस्थेचा १४ टक्के लाभांश
इस्लामपूर : वाळवा तालुका माध्यमिक शाळा सेवकांच्या पतसंस्थेच्यावतीने सभासदांना १४ टक्के लाभांश आणि भेटवस्तू देण्यात येणार असल्याची घोषणा अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी केली.
संस्थेची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने झाली. सभेत सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. चव्हाण म्हणाले, ५३ कोटींच्या ठेवी आहेत. ३९ कोटींचे कर्जवाटप केले असून, ५० लाख रुपयांचा नफा झाला आहे. मृत सभासदांच्या वारसांना १० लाख, तर मोठ्या शस्त्रक्रियेसाठी २० हजार रुपयांची मदत दिली जाते. पारदर्शी कामकाजामुळे संस्था सहकारात लौकिकप्राप्त आहे.
उपाध्यक्ष अशोक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शिवाजी मोरे यांनी आभार मानले. यावेळी संचालक अशोक गिरी, सुनील पाटील, सुरेश साठे, सुरेश कासार, दादासाहेब जाधव, हिंदुराव खैरमोडे, शंकर भालेकर, सुनील पाटील, अश्विनी पाटील, शोभा नायकवडी, सुनीता वाकळे, समन्वय समितीचे अध्यक्ष संजय पाटील-ढोबळे, सचिव सुनील कीर्दक उपस्थित होते.