जिल्ह्यात कोरोनाचे १३०८ नवे रुग्ण; ५० जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:35 IST2021-04-30T04:35:34+5:302021-04-30T04:35:34+5:30

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या गुरुवारी पुन्हा वाढताना १३०८ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. वाढती मृतांची संख्याही कायम असून, ...

1308 new corona patients in the district; 50 killed | जिल्ह्यात कोरोनाचे १३०८ नवे रुग्ण; ५० जणांचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाचे १३०८ नवे रुग्ण; ५० जणांचा मृत्यू

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या गुरुवारी पुन्हा वाढताना १३०८ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. वाढती मृतांची संख्याही कायम असून, जिल्ह्यातील ३६ जणांसह परजिल्ह्यांतील १४ अशा ५० जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात अडीचशेच्यावर रुग्ण, तर वाळवा आणि तासगाव तालुक्यांत प्रत्येकी सातजणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ७९८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यूची संख्या सरासरी ३० च्यावर कायम आहे. गुरुवारी सांगली २, मिरज शहरातील १ यासह वाळवा आणि तासगाव तालुक्यातील प्रत्येकी ७, जत आणि मिरज तालुक्यांतील प्रत्येकी ५, तर आटपाडी ३, कडेगाव, शिराळा २, खानापूर आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. खानापूर, मिरज आणि वाळवा तालुक्यांतील रुग्णांची वाढती संख्या कायम आहे.

आरोग्य विभागाच्यावतीने गुरुवारी आरटीपीसीआर अंतर्गत २२९८ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ७०८ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर रॅपिड अँटिजेनच्या २८६२ जणांच्या तपासणीतून ६६८ जण बाधित आढळले आहेत.

उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, सध्या १२ हजार ९१८ जण उपचार घेत आहेत. त्यात २११३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील १९०६ जण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, तर २०७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

परजिल्ह्यातील १४ जणांचा मृत्यू झाला असून, दिवसभरात ६८ नवे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ७४३९८

उपचार घेत असलेले १२९१८

कोरोनामुक्त झालेले ५९२३८

आतापर्यंतचे एकूण मृत्यू २२४२

गुरुवारी दिवसभरात

सांगली १६१

मिरज ९४

मिरज तालुका २०३

कडेगाव १७२

खानापूर १६३

वाळवा १२५

कवठेमहांकाळ ९७

तासगाव ७९

जत ७६

आटपाडी ७१

शिराळा ४२

पलूस २५

Web Title: 1308 new corona patients in the district; 50 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.