शासकीय कार्यालयांकडे १३ लाखांची घरपट्टी थकित

By Admin | Updated: August 11, 2014 23:34 IST2014-08-11T23:12:28+5:302014-08-11T23:34:05+5:30

गेली अनेक वर्षे थकित

13 lakhs house stays exhausted to government offices | शासकीय कार्यालयांकडे १३ लाखांची घरपट्टी थकित

शासकीय कार्यालयांकडे १३ लाखांची घरपट्टी थकित

मिरज : मिरजेत तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यासह विविध शासकीय विभागांच्या २३ इमारतींची १३ लाख ५५ हजार रुपये घरपट्टी थकित आहे. महापालिकेच्या कर विभागाने थकित घरपट्टी वसुलीसाठी संबंधित शासकीय कार्यालयांना जप्तीची नोटीस बजावली आहे. शासकीय कार्यालयांच्या इमारतींची घरपट्टी गेली अनेक वर्षे थकित आहे. महापालिकेच्या शिक्षण मंडळानेही घरपट्टी भरली नसल्याने मंडळास वसुलीची नोटीस देण्यात आली आहे. थकित घरपट्टीसाठी जप्तीची नोटीस बजावण्यात आलेली शासकीय कार्यालये व त्यांची थकबाकीची रक्कम पुढीलप्रमाणे आहे. तहसील कार्यालय २५,२३६ रुपये, मिरज शहर पोलीस ठाणे - १,५३,१७४, केंद्रीय जल आयोग - ५६,३३४, सार्वजनिक बांधकाम विभाग - १,२९,०३०, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण - ३७,३९२, सार्वजनिक बांधकाम विभाग - ६,८८५, शासकीय धान्य गोदाम- ३,६६,९३९, महसूल भवन - १,६२,४४६, महापालिका शिक्षण मंडळ - १,३५, १४७, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता - १,६७,२६७, शासकीय विश्रामगृह - ९३,११६ , कार्यकारी अभियंता इमारत, दळणवळण विभाग - १३,४५१, मतिमंद मुलांची शाळा १५,५६४. (वार्ताहर)

Web Title: 13 lakhs house stays exhausted to government offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.