कामेरी परिसरात दोन दिवसात १३ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:21 IST2021-06-05T04:21:12+5:302021-06-05T04:21:12+5:30

कामेरी : कामेरी (ता. वाळवा) प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी सहा तर गुरुवारी सातजण कोरोनाबाधित आढळले होते. दोन दिवसात ...

13 corona in two days in Kameri area | कामेरी परिसरात दोन दिवसात १३ कोरोनाबाधित

कामेरी परिसरात दोन दिवसात १३ कोरोनाबाधित

कामेरी : कामेरी (ता. वाळवा) प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी सहा तर गुरुवारी सातजण कोरोनाबाधित आढळले होते.

दोन दिवसात कामेरीत ९, विठ्ठलवाडी २ व येडेनिपाणी आणि गाताडवाडीत एक असे १३ कोरोनाबाधित सापडले. दोन दिवसात ३७ अँटिजन चाचण्या करण्यात आल्या. यापैकी २४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिवटे यांनी दिली.

त्यामुळे फेब्रुवारीपासून आजअखेर दुसऱ्या लाटेत कामेरीतील बाधितांची एकूण संख्या ३७१ झाली आहे. सध्या ७४ जण उपचार घेत आहेत. येडेनिपाणीत १३३पैकी ४२, विठ्ठलवाडीत ६७पैकी ३३, गाताडवाडीत ३८पैकी ८, शिवपुरीत १४पैकी ४ बाधितांवर गृह अलगीकरणात व ग्रामपंचायतीच्या कोरोना सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

Web Title: 13 corona in two days in Kameri area