शहरं
Join us  
Trending Stories
1
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
2
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
3
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
4
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
5
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
6
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
7
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
8
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
9
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
10
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
11
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
12
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
13
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
14
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
15
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
16
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
17
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
18
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
19
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
20
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका

सांगलीत आंतरराज्य चोरट्यांकडून १३ दुचाकी जप्त, दोघांना अटक

By घनशाम नवाथे | Published: April 27, 2024 2:19 PM

एकजण रेकॉर्डवरील आरोपी

सांगली : राष्ट्रीय महामार्गावरील तानंग फाटा पुलाखाली चोरीची दुचाकी विक्रीसाठी आलेल्या रणजीत श्रीरंग लोखंडे (वय २५, सध्या रा. अहिल्यानगर, मुळ रा. मल्हारवाडी, मंगसुळी, ता. अथणी) व अशोक विश्वनाथ काशिद (वय २६, सध्या रा. प्रकाशनगर, मूळ रा. मांजरी, ता. चिक्कोडी) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. दोघांकडून चोरीच्या १३ दुचाकी जप्त केल्या आहेत.

अधिक माहिती अशी, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केले आहे. या पथकातील कर्मचाऱ्यांना तानंग फाटा येथे पुलाखाली दोघे संशयित विना नंबरप्लेटची दुचाकी घेऊन आले असून दुचाकी विक्री करणार आहेत अशी माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे धाव घेतली. दोघांना पळून जाण्याची संधी न देता पकडले.

दोघांची चौकशी केल्यानंतर त्यांनी काही दुचाकी चोरल्याची कबुली देत त्यापैकीच ही एक असल्याचे सांगितले. चोरीच्या दुचाकी अहिल्यानगर येथे राहत असलेल्या घराजवळ मोकळ्या जागेत लावल्याचे सांगितले. तेव्हा पथकाने दोघांना घेऊन जाऊन अहिल्यानगर येथून चोरीच्या १३ दुचाकी जप्त केल्या. त्याची किंमत सुमारे साडे सहा लाख रूपये इतकी आहे. दोघांना तपासासाठी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याकडे वर्ग केले आहे.सहायक निरीक्षक पवार, सहायक फौजदार अनिल ऐनापुरे, कर्मचारी सचिन धोत्रे, इम्रान मुल्ला, अरूण पाटील, अमोल ऐदाळे, कुबेर खोत, प्रकाश पाटील, अनंत कुडाळकर, सूरज थोरात, सुनिल जाधव, विनायक सुतार, अभिजीत ठाणेकर, रोहन घस्ते, श्रीधर बागडी, कॅप्टन गुंडवाडे, विवेक साळुंखे, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

एकजण रेकॉर्डवरील आरोपीदोघा चोरट्यांनी मिरज ग्रामीण, तासगाव, कुपवाड, कवठेमहांकाळ, सांगली शहर, कागवाड, कुडची येथे दुचाकी चोरल्या आहेत. रणजीत लोखंडे हा रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याच्याविरूद्ध चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस