१२६ प्राणांतिक वाहन

By Admin | Updated: December 1, 2014 00:06 IST2014-11-30T22:44:35+5:302014-12-01T00:06:56+5:30

चौपदरीकरणाची मागणी : जिल्ह्यात घडलेल्या अपघातानंतर बोध घ्या

126 physical vehicles | १२६ प्राणांतिक वाहन

१२६ प्राणांतिक वाहन

प्रकाश वराडकर - रत्नागिरी -जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यांच्या काळात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व जिल्ह्यातील इतर मार्गांवर झालेल्या १२६ प्राणांतिक वाहन अपघातात १४३ जणांचा मृत्यू झाला. मुंबई - गोवा महामार्गावर सर्वाधिक ७६ अपघात झाले असून, त्यात ९२ जणांना प्राण गमवावा लागल्याने हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे या महामार्गाचे लवकरात लवकर चौपदरीकरण होण्याची मागणी सुरू झाली आहे.
राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी अरुंद पूल, अरूंद रस्ते तसेच तीव्र चढ-उतारांबरोबरच धोकादायक वळणे, रस्त्यावर असलेले खड्डे यामुळे या रस्त्याची माहिती नसलेल्या तसेच बेदरकारपणे वाहने हाकणाऱ्या चालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय महामार्गावर जानेवारी २०१४ ते आॅक्टोबर २०१४ या दहा महिन्यांत झालेल्या ७६ अपघातात ७० पुरुष व २२ महिला मिळून ९२ जणांचा मृत्यू झाला, तर ७९ अपघातात २४० पुरुष व ६५ महिलांसह ३०५ जण गंभीर जखमी झाले. ९१ अपघातांत ४८९ जण किरकोळ जखमी झाले. राज्य महामार्गावर याच दहा महिन्यात झालेल्या १४ अपघातात १२ पुरुष व २ महिलांसह १४ जणांचा मृत्यू झाला. २५ अपघातात ४५ पुरुष व १० महिलांसह ५५ जण गंभीर जखमी झाले. याच कालावधीत राज्य महामार्गावर ८ अपघातात २३ जण किरकोळ जखमी झाले. दहा महिन्यांत ३६ अपघातात ३५ पुरुष व २ महिलांसह ३७ जणांचा बळी गेला. ६० अपघातात ९४ पुरुष व २६ महिलांसह १२० जणांना प्राणास मुकावे लागले.


भीषण अपघाताला कारणीभूत...
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर गेल्या दहा महिन्यात झालेल्या भीषण अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले. मात्र, चौपदरीकरणाचे कवित्व सुरूच आहे. रस्ते अपघात का घडतात, कसे घडतात, त्यातून संबंधित शासनप्रणालीने या विषयात गंभीर दखल घेऊन यावर योग्य उपाय योजले पाहिजेत. रस्त्यावरील भीषण अपघातानंतर मागे उरलेले सत्य आपण पाहतो. मात्र, हे सत्य जबाबदारी का स्वीकारीत नाहीत, असा प्रश्न विचारला जात असला तरी महामार्गावरील अनेक कारणे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. अनेक नेत्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याच्या घोषणा केल्या. मात्र, त्या कमी प्रमाणात येत आहेत. कोकणी माणसाने यापूर्वी रेल्वेचे स्वप्न पाहिले, अथक प्रयत्नांनंतर व सततच्या रेट्यानंतर ते सत्यात उतरले आहे. आता चौपदरीकरणाला सुरूवात झाली आहे. मात्र, हे काम कधी पूर्ण होणार हा प्रश्न ज्याच्या तोंडी कायम आहे. अधिकारी, पत्रकार, समाजसेवक, लोकप्रतिनिधी, मंत्री यांनी यात जातीने लक्ष घालायलाच हवे, असे मत आता व्यक्त होत ्आहे.


पाच वर्षातील अपघात
वर्ष अपघात मृत्यू
2009948123
2010957169
2011968149
2012901160
2013145 66
2014126143


सावर्डे - येथे सन २००९मध्ये पाचजण ठार झाले होते. खेडमध्ये २०१० साली झालेल्या लक्झरी बस व कार अपघातात दहाजणांचा बळी बळी गेला, तर नोव्हेंबर २0१२मध्ये नीता ट्रॅव्हल्सच्या गाडीला सावर्डे येथे झालेल्या अपघातात सहाजण दगावले होते. देवळे अपघातात पाचजण मृत्यूमुखी पडले होते.

Web Title: 126 physical vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.