शिराळा तालुक्यात १२५ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:28 IST2021-05-19T04:28:23+5:302021-05-19T04:28:23+5:30
शिराळा : शिराळा तालुक्यातील ३६ व वाळवा, शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येकी एक अशा एकूण ३८ गावांत १२५ जणांचा कोरोनाचा अहवाल ...

शिराळा तालुक्यात १२५ नवे रुग्ण
शिराळा : शिराळा तालुक्यातील ३६ व वाळवा, शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येकी एक अशा एकूण ३८ गावांत १२५ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील यांनी दिली.
ते म्हणाले की, अंत्री बुद्रुक, बिळाशी, चिंचोली, धामवडे, खिरवडे, कोकरूड, मणदूर, मांगरूळ, शिरसटवाडी, येळापूर, तसेच शाहूवाडी तालुक्यातील डिगे शिराळे, वाळवा तालुक्यातील डोंगरवाडी येथे प्रत्येकी एक, चिखलवाडी, देववाडी, फकिरवाडी, जांभळेवाडी, मोहरे, पणुंब्रे वारूण, टेड, शेडगेवाडी येथे प्रत्येकी दोन, भाटशिरगाव, बिऊर, गिरजवडे, कांदे, करमाळे, नाठवडे, भैरेवाडी, तडवळे येथे प्रत्येकी तीन, पाडळेवाडी चार, लादेवाडी, मांगले, वाकुर्डे बुद्रुक येथे प्रत्येकी ५, पाचुंबी सहा, पाडळी, शिराळा, प्रत्येकी सात, सांगाव नऊ, चरण १०, वीरवाडी १७ असे एकूण १२५ रुग्ण आढळून आले आहेत.