शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

‘चांदोली’त १२.३६ टीएमसी पाणीसाठा

By admin | Updated: April 26, 2016 00:47 IST

वीज निर्मिती बंद : वारणा नदीत १८२० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

वारणावती : चांदोली धरणामध्ये १२.३६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, कर्नाटकला एक टीएमसी पाणी द्यायचे असल्याने धरणातून १८२० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरू आहे. पाणीसाठा कमी झाल्याने वीज निर्मिती रविवारी सायंकाळी पाचपासून बंद करण्यात आली आहे. धरणामध्ये शिल्लक असणारे पाणी जूनपर्यंत पुरेल, असा अंदाज धरण प्रशासनाने व्यक्त केला आहे.शिराळा तालुक्याच्या पश्चिम टोकावर असणारे चांदोली धरण, दुष्काळी भीषण परिस्थितीत वरदान ठरत आहे. पावसाळ्यात या धरणात ३४ टीएमसी पाणीसाठा झाला होता. सिंचनासाठी पाण्याचा वापर कालव्यातून व वारणा नदीतून केला जातो. आजपर्यंत २२ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे, तर १२.३६ टीएमसी पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. येत्या चार-पाच दिवसात कर्नाटकला लागणारे एक टीएमसी पाणी देण्याचे नियोजन पूर्ण होईल. त्यानंतर सुमारे १२०० ते १३०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू राहील. एवढ्या विसर्गाने पाणी सोडले तरीही, धरणातील पाणी जूनपर्यंत पुरेल, असा अंदाज आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा ५.४५ टीएमसी आहे. त्यामुळे सुमारे सात टीएमसी पाणी वापरता येणार आहे. धरणाची पाणी पातळी ५९९.४५ मीटर असून ३४९.१७० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ३४.८४ टक्के आहे.धरणाच्या पाण्यावर वीजनिर्मिती करणारी १६ मेगावॅट वीज निर्मितीची दोन जनित्रे आहेत. धरणातील पाणी पातळी कमी झाल्याने ही दोन्ही जनित्रे रविवारी सायंकाळपासून बंद केली आहेत. मुख्य कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी बंद करून धरणातून १८२० क्युसेक्सचा निसर्ग वारणा नदीत सोडला. कर्नाटकसह दुष्काळी भागाला चांदोली धरण वरदान ठरत आहे. (वार्ताहर)