शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूरसाठी १२३ कोटींची पाणी योजना मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 17:20 IST

भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमधून देण्यात आली माहिती

इस्लामपूर : इस्लामपूर शहरासाठी केंद्र शासनाच्या अमृत-२ अभियानातून १२३ कोटी रुपये खर्चाच्या २४ तास पिण्याचे पाणी देणाऱ्या योजनेस महाराष्ट्र शासनाने तांत्रिक मंजुरी दिल्याची माहिती भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमधून देण्यात आली.माजी नगराध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले, आगामी ३० वर्षांच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून ही अत्याधुनिक स्काडा पद्धतीने संगणकीय प्रणालीवर चालणारी योजना आहे. दररोज दोन कोटी ७० लाख ५० हजार लिटर पाण्याचे वितरण करणार आहे. पूर्णपणे सौरऊर्जेवर सुरू राहणार आहे. १८० किलोमीटरची एचडीपी पाइपलाइन व सात नव्या टाक्या उभारल्या जाणार आहेत. प्रत्येक कुटुंबाला अल्ट्रासॉनिक मीटर मोफत दिले जाणार आहे.

ते म्हणाले, १२३ कोटी रुपयांचा निधी मिळणारी ‘ब ’वर्गातील राज्यातील ही एकमेव पालिका आहे. सर्व भागांत समान दाबाने प्रतिमाणसी १३५ लिटर पाणी मिळणार आहे. २०५५ पर्यंतचा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. पालकमंत्री सुरेश खाडे, शिवसेनेचे आनंदराव पवार, विक्रम पाटील, राहुल महाडिक, वैभव पवार यांचेही योगदान या योजनेसाठी मिळाले आहे.विक्रम पाटील म्हणाले, ३० वर्षांच्या सत्ताकाळात राष्ट्रवादीने भुयारी गटार, २४ बाय ७ पाणी योजनेचे गाजर दाखवत निवडणुका लढवल्या. १९९५ साली राज्यातील युती शासनाने नवीन पाणी योजनेसाठी मंजुरी देण्याची तयारी दाखवली होती. मात्र युतीला श्रेय मिळेल म्हणून राष्ट्रवादीने विरोध केला.

ते म्हणाले, गेल्या पालिका निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता ताब्यात द्या, शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द दिला होता. नव्या पाणी योजनेसाठी १२३ कोटींचा निधी देत त्यांनी शब्द खरा केला आहे.विकास आघाडीने दिलेला शब्द पाळला

विक्रम पाटील म्हणाले, विकास आघाडीने दिलेला प्रत्येक शब्द पाळून विकासकामे केल्याने शहरातील जनता आमच्या पाठीशी उभा राहिली.भाजपमधील गटबाजी कायम

पाणी योजनेसाठी निधी मंजूर झाल्याची माहिती भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमधून देण्यात आली. त्यातून पक्षातील गटबाजी कायम असल्याचे स्पष्ट झाले.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीislampur-acइस्लामपूर