तासगाव तालुक्यात ३५ गावांत १२२ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:45 IST2021-05-05T04:45:09+5:302021-05-05T04:45:09+5:30

तासगाव : तासगाव तालुक्यात मंगळवारी ३५ गावांत १२२ कोरोना रुग्ण आढळून आले, तर ९१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तासगाव ...

122 patients in 35 villages in Tasgaon taluka | तासगाव तालुक्यात ३५ गावांत १२२ रुग्ण

तासगाव तालुक्यात ३५ गावांत १२२ रुग्ण

तासगाव : तासगाव तालुक्यात मंगळवारी ३५ गावांत १२२ कोरोना रुग्ण आढळून आले, तर ९१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तासगाव तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र दिसून येत असून, वाढत्या साखळीला अद्याप ब्रेक लागलेला नाही.

मंगळवारी आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत तासगाव शहरात तेरा, आळते तीन, अंजनी पाच, बोरगाव चार, चिखलगोठण एक, चिंचणी दहा, दहिवडी एक, धामणी तीन, डोंगरसोनी सहा, हातनोली एक, हातनूर दोन, जरंडी सहा, कवठेएकंद एक, किदरवाडी दोन, कौलगे दोन, लिंब एक, लोकरेवाडी एक, मणेराजुरी पंधरा, नरसेवाडी एक, निमणी एक, पेड एक, राजापूर चार, सावळज चार, सावर्डे दहा, शिरगाव कवठे एक, शिरगाव वि. सहा, सिद्धेवाडी एक, वंजारवाडी एक, वासुंबे चार, विसापूर तीन, वाघापूर एक, वायफळे एक, यमगरवाडी दोन आणि येळावीत दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.

Web Title: 122 patients in 35 villages in Tasgaon taluka