शिराळा तालुक्यात १२१ नवीन कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:28 IST2021-05-27T04:28:58+5:302021-05-27T04:28:58+5:30

शिराळा : शिराळा तालुक्यात बुधवारी ४८ गावांमध्ये १२१ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शिराळा, मांगले, सांगाव ...

121 new corona patients in Shirala taluka | शिराळा तालुक्यात १२१ नवीन कोरोना रुग्ण

शिराळा तालुक्यात १२१ नवीन कोरोना रुग्ण

शिराळा : शिराळा तालुक्यात बुधवारी ४८ गावांमध्ये १२१ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शिराळा, मांगले, सांगाव ही हॉटस्पॉट गावे झाली आहेत. गृहविलगीकरण कक्षात असणाऱ्या एक हजार रुग्णांची संस्था विलगीकरण कक्षात कशी सोय करायची, हा मोठा प्रश्न प्रशासनापुढे आहे.

सांगाव, मांगले, शिराळा प्रत्येकी १०, खिरवडे ७, चिंचोली, कणदूर, शिरसी प्रत्येकी ५, मणदूर, रिळे, वाकाईवाडी, प्रत्येकी ४, भागाईवाडी, भाटशिरगाव, पाडळेवाडी प्रत्येकी ३ यासह ४८ गावांत १२१ रुग्ण आढळून आले आहेत. एकूण ११४७ ॲक्टिव्ह रुग्ण असून गृहविलगीकरण कक्ष १०५२, संस्था विलगीकरण कक्ष ७, उपजिल्हा रुग्णालय ४९, कोकरूड ग्रामीण रुग्णालय २५, स्वस्तिक कोविड सेंटर, मिरज कोविड रुग्णालय ४, सांगली शासकीय रुग्णालय ३, खाजगी रुग्णालय ५ असे रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: 121 new corona patients in Shirala taluka