शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

टेंभू योजनेसाठी १२०३ कोटी मंजूर : संजयकाका पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 00:45 IST

सांगली : महाराष्टÑातील सिंचन योजना पूर्णत्वास नेण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली असून, टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी १२०३ कोटी ६६ लाख रुपयांच्या निधीस बुधवारी केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली. २०१९ पर्यंत या निधीअंतर्गत कामे पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे.दिल्ली येथे सिंचन योजनांबाबत झालेल्या बैठकीस कृष्णा खोरे विकास ...

ठळक मुद्देउरमोडी प्रकल्पासाठी ४८३ कोटी; दिल्लीतील बैठकीत नितीन गडकरी यांनी दिली मान्यता

सांगली : महाराष्टÑातील सिंचन योजना पूर्णत्वास नेण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली असून, टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी १२०३ कोटी ६६ लाख रुपयांच्या निधीस बुधवारी केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली. २०१९ पर्यंत या निधीअंतर्गत कामे पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे.

दिल्ली येथे सिंचन योजनांबाबत झालेल्या बैठकीस कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, खासदार राजेंद्र गावित, आमदार कपिल पाटील आदी उपस्थित होते. या बैठकीविषयी संजयकाका पाटील यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, नितीन गडकरींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून टेंभू योजनेसाठी भरीव निधी मंजूर झाला आहे. बळीराजा जल संजीवनी योजनेतून महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण क्षेत्रातील तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त क्षेत्रातील ८ प्रमुख सिंचन योजनांकरिता १३ हजार ६५१ कोटी ६१ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

या निधीमुळे या सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रातील ७ लाख ६८ हजार ३७५ एकर इतकी जमीन ओलिताखाली येणार आहे. यातील टेंभू उपसा सिंचन सिंचन योजनेकरिता बळीराजा जल संजीवनी योजनेतून आता १२०३ कोटी रुपये निधीची तरतूद केलेली असून यामुळे २ लाख ४० हजार ७९८ एकर इतक्या लाभक्षेत्राला फायदा होणार आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील उरमोडी सिंचन प्रकल्पासाठी याच योजनेतून ४८३.०१ कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील ६० हजार ९३० एकर इतकी जमीन ओलिताखाली येणार आहे.

या भरीव तरतुदीमुळे बऱ्याच वर्षांपासून रखडलेल्या सिंचन योजना पूर्णत्वाकडे जाऊन, सततच्या दुष्काळी परिस्थितीचा कलंक कायमचा पुसण्यास मदत होणार आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वाकडे नेण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्य व केंद्र सरकारकडे भविष्यातही पाठपुरावा करून मे २०१९ पर्यंत हे प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार असेल, असेही संजयकाका पाटील यांनी यावेळी सांगितले.वंचित गावांना लाभकृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजयकाका पाटील म्हणाले, बळीराजा जल संजीवनी योजनेच्या माध्यमातून खºयाअर्थाने पश्चिम महाराष्टÑातील सिंचन प्रकल्पांना नवसंजीवनी मिळाली आहे. येत्या २०१९ पर्यंत यातील सर्व कामे पूर्ण करण्यात येतील. जतपर्यंतची कामे पूर्ण करतानाच योजनेपासून वंचित गावांनाही सामावून घेण्यात येईल.

टॅग्स :SangliसांगलीNitin Gadkariनितीन गडकरीfundsनिधी