नेर्लेतील शिबिरात ११६ रक्तदात्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:27 IST2021-05-11T04:27:25+5:302021-05-11T04:27:25+5:30

नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथील तुषार जितेंद्र माने याच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त झालेल्या रक्तदान शिबिरात ११६ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवाला. ...

116 blood donors participate in the camp in Nerle | नेर्लेतील शिबिरात ११६ रक्तदात्यांचा सहभाग

नेर्लेतील शिबिरात ११६ रक्तदात्यांचा सहभाग

नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथील तुषार जितेंद्र माने याच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त झालेल्या रक्तदान शिबिरात ११६ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवाला. तुषार माने मित्र परिवार यांच्यावतीने शिबिर पार पडले. रक्तदात्यांना वस्तू व रक्तदान प्रमाणपत्र देण्यात आले.

सरपंच सौ. छाया रोकडे, वैद्यकीय अधिकारी सागर शिंदे, बाळासाहेब रोकडे, जितेंद्र माने, प्रवीण माने, जयकर माने यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. कासेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मते यांनी भेट दिली. तुषार माने याचे मित्र सौरव ऊर्फ सत्या पाटील, विश्वजीत पाटील, सागर पाटील, सूरज माळी, निकेत माळी, विशाल गावडे, पवन गुरव, आदित्य शिद, पारस माने, तेजस कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.

चौकट

युवतींनी केले रक्तदान

शिबिरात वैष्णवी माने, रोहिणी पाटील, आरती माने, अमृता माने या युवतींनीही रक्तदान केले.

Web Title: 116 blood donors participate in the camp in Nerle