शिराळा तालुक्यात ११४ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:27 IST2021-05-26T04:27:58+5:302021-05-26T04:27:58+5:30
शिराळा : तालुक्यात मंगळवारी ३८ गावांमध्ये ११४ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शिराळा, मांगले, सांगाव ही ...

शिराळा तालुक्यात ११४ कोरोना पॉझिटिव्ह
शिराळा : तालुक्यात मंगळवारी ३८ गावांमध्ये ११४ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शिराळा, मांगले, सांगाव ही हॉटस्पॉट गावे झाली आहेत. मांगले परिसरातील देववाडी, लादेवाडी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. ॲक्टिव्ह रुग्णसंख्येने एक हजार आकडा ओलांडला आहे.
सांगाव २४ , देववाडी १२, लादेवाडी ८, पाचुंबरी ७, मांगले , शिराळा प्रत्येकी ६ , कोकरूड ४ , भाटशिरगाव , बिऊर, वाकुर्डे बुद्रुक प्रत्येकी ३ या गावांसह ३८ गावांत ११४ रुग्ण आढळून आले आहेत.
एकूण १०७७ ॲक्टिव्ह रुग्ण असून, गृह विलगीकरण कक्ष ८८६ , संस्था विलगीकरण कक्ष १०१, उपजिल्हा रुग्णालय ४० , कोकरूड ग्रामीण रुग्णालय २५ , स्वस्तिक कोविड सेंटर १९, मिरज कोविड रुग्णालय २, खासगी रुग्णालय ४ असे रुग्ण उपचार घेत आहेत.