शिराळा तालुक्यात ११२ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST2021-05-31T04:20:57+5:302021-05-31T04:20:57+5:30
शिराळा : तालुक्यात रविवारी रोजी ४० गावांमध्ये ११२ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शिराळा, मांगले, सांगाव, मणदूर ...

शिराळा तालुक्यात ११२ रुग्ण
शिराळा : तालुक्यात रविवारी रोजी ४० गावांमध्ये ११२ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शिराळा, मांगले, सांगाव, मणदूर ही हॉटस्पॉट गावे झाली आहेत. मांगले गावाच्या जवळील गावातही रुग्णसंख्या वाढत आहे.
मांगले १५, सांगाव १०, पाडळेवाडी ७, उपवळे, खिरवडे प्रत्येकी ६, बोरगेवाडी ५, इंगरूळ, शिराळा प्रत्येकी ४, अतुगडेवाडी, चिखली, चिंचोली, ढोलेवाडी, मालेवाडी, पाचुम्बरी, तडवळे प्रत्येकी ३ यांसह ४० गावांत ११२ रुग्ण आढळून आले आहेत. एकूण १२३७ ॲक्टिव्ह रुग्ण असून, गृहविलगीकरण कक्ष ११५०, संस्था विलगीकरण कक्ष ७, उपजिल्हा रुग्णालय ४०, कोकरूड ग्रामीण रुग्णालय १७, स्वस्तिक कोविड सेंटर ११, मिरज कोविड रुग्णालय ४, सांगली शासकीय रुग्णालय २, खासगी रुग्णालय ५ असे रुग्ण उपचार घेत आहेत.