शिराळा तालुक्यात ११० रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:35 IST2021-06-09T04:35:13+5:302021-06-09T04:35:13+5:30
शिराळा : शिराळा तालुक्यात सोमवारी ३३ गावांमध्ये ११० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. गेल्या पंधरा दिवसात रविवारी रुग्णसंख्येत ...

शिराळा तालुक्यात ११० रुग्ण
शिराळा : शिराळा तालुक्यात सोमवारी ३३ गावांमध्ये ११० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. गेल्या पंधरा दिवसात रविवारी रुग्णसंख्येत माेठी घट झाली हाेती. त्यामुळे दिलासादायक चित्र असताना रविवारी पुन्हा रुग्णसंख्या वाढली आहे. शिराळा, मांगले, सांगाव, गिरजवडे, मणदूर, तडवळे हॉटस्पॉट गावे झाली आहेत.
रविवारी मांगले येथे १३, शिराळा येथे ९, अंत्री बुद्रुक व कांदे येथे प्रत्येकी ७, चरण येथे ६, मांगरुळ, निगडी, तडवळे येथे प्रत्येकी ५, आटूगडेवाडी, भाटशिरगाव, इंगरुळ, सांगाव येथे प्रत्येकी ४ यासह अन्य ३३ गावांत एकूण ११० रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात एकूण १०१५ ॲक्टिव्ह रुग्ण असून गृहविलगीकरणात ९९३, संस्था विलगीकरणात १, उपजिल्हा रुग्णालयात ४५, कोकरूड ग्रामीण रुग्णालयात २०, स्वस्तिक कोविड सेंटरमध्ये ९ रुग्ण उपचार घेत आहेत.