शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Ladki Bahin Yojana: सांगली जिल्ह्यात सव्वासात लाख बहिणींना मिळाला सहावा हप्ता, किती कोटी जमा झाले.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 16:58 IST

२१०० रुपयांचा आदेश अद्याप नाही

सांगली : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पाच हप्ते निवडणुकीपूर्वी वर्ग केले होते. आता सहावा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला आहे. ही प्रक्रिया जिल्ह्यात सुरू झाली आहे. सहावा हप्तादेखील एक हजार ५०० रुपयांप्रमाणेच महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे. जिल्ह्यातील सात लाख ३८ हजार ५४ महिलांच्या खात्यावर ११० कोटी ७० लाख ८१ हजार रुपये जमा झाले आहेत.महायुती सरकारने जुलैपासून महिलांना एक हजार ५०० रुपयांचा दरमहा निधी देण्याची घोषणा केली होती. महिलांच्या आर्थिक अडचणी सोडवता याव्यात. त्यांच्या आरोग्याबाबत खबरदारी घेता यावी, याशिवाय इतरही छोट्या-मोठ्या अडचणी सोडवताना मदतीचा हात मिळावा म्हणून एक हजार ५०० रुपयांची मदत दिली आहे.जिल्ह्यात या योजनेमध्ये आतापर्यंत सात लाख ३८ हजार ५४ लाभार्थी महिला पात्र ठरल्या आहेत. महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पाच हप्ते जमा केले. यानंतर आचारसंहितेमुळे प्रकरणे थांबली होती. अनेक प्रकरणांमध्ये उत्पन्नाच्या दाखल्याचा अडथळा निर्माण झाला होता. या अर्जांची छाननी करून त्रुटीदेखील दुरुस्त केली. या सर्व खात्यांमध्ये आता लाडक्या बहिणींचा निधी वर्ग केला जात आहे. निवडणुकीमध्ये महायुती सरकारने महिलांना दोन हजार १०० रुपये दरमहा देण्याची घोषणा केली होती. यानुसार सरकार स्थापन झाल्यावर हा निधी मिळेल, अशी अपेक्षा महिलांना होती. प्रत्यक्षात एक हजार ५०० रुपयेच खात्यामध्ये जमा झाले आहेत. वाढीव मदतीसाठी तसा अध्यादेश निघणे आवश्यक आहे. यासंदर्भात तरतूद झाल्याचे सांगितले जात असले, तरी अद्यापही आदेश न निघाल्याने एक हजार ५०० रुपये खात्यामध्ये वळते झाले. वाढीव निधी कधी जमा होईल, याबाबत शासनाचे आदेश नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमातालुका - लाभार्थी संख्या - रक्कमक.महांकाळ - ४०३४० - ६.०५ कोटीकडेगाव - ४१४२२ - ६.२१ कोटीआटपाडी - ४५४१३ - ६.८१ कोटीखानापूर - ४२६१३  - ६.३९ कोटीशिराळा - ४५२७५ - ६.७९ कोटीपलूस - ३९७७२ - ५.९६ कोटीतासगाव - ६४०१८ - ९.६० कोटीवाळवा - ११९०७६ - १७.८६ कोटीजत - ९०७७० - १३.६१ कोटीमिरज - २०९८१६ - ३१.४७ कोटीएकूण - ७३८०५४ - ११०.७० कोटी

जिल्ह्यातील सात लाख ३८ हजार ५४ महिलांच्या खात्यावर डिसेंबर २०२४ या महिन्याचा एक हजार ५०० प्रमाणे सहावा हप्ता जमा केला आहे. दोन हजार १०० प्रमाणे हप्ता जमा करण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणताही आदेश नाही. - संदीप यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग

टॅग्स :Sangliसांगलीladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाbankबँकWomenमहिला