सुरेश खाडेंच्या वाढदिवसानिमित्त मिरज सिव्हिलला ११ व्हेंटिलेटर प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:20 IST2021-06-02T04:20:55+5:302021-06-02T04:20:55+5:30

मिरज : मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज शासकीय रुग्णालयास सुमारे एक कोटी रुपये स्थानिक विकास निधीतून ...

11 ventilators provided to Miraj Civil on the occasion of Suresh Khade's birthday | सुरेश खाडेंच्या वाढदिवसानिमित्त मिरज सिव्हिलला ११ व्हेंटिलेटर प्रदान

सुरेश खाडेंच्या वाढदिवसानिमित्त मिरज सिव्हिलला ११ व्हेंटिलेटर प्रदान

मिरज : मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज शासकीय रुग्णालयास सुमारे एक कोटी रुपये स्थानिक विकास निधीतून ११ व्हेंटिलेटर प्रदान करण्यात आले.

जिल्ह्यात व्हेंटिलेटरअभावी अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. मिरज सिव्हिलमधील ८० व्हेंटिलेटर अपुरे पडत आहेत. या पार्श्वभूमीवर आ. सुरेश खाडे यांनी वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करून वाढदिनी मिरज शासकीय रुग्णालयास स्थानिक विकास फंडातून एक कोटी रुपये किमतीचे ११ व्हेंटिलेटर रुग्णालय अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांच्याकडे प्रदान केले. यावर्षी आ. सुरेश खाडे यांनी आपला वाढदिवस मिरज शासकीय कोविड रुग्णालयात अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला. यावेळी जि. प. अध्यक्षा प्राजक्ता कोरे, मोहन व्हनखंडे, अनिता व्हनखंडे, बाबासाहेब आळतेकर, गणेश माळी, गजेंद्र कुळ्ळोळी यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Web Title: 11 ventilators provided to Miraj Civil on the occasion of Suresh Khade's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.