शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईच्या 'गॅस'वरुन आता संसाराच्या 'चुली'वर; सांगली जिल्ह्यात ११ भरारी पथकांकडून तपासणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 18:55 IST

महिना होऊनही गॅस नोंदणी होत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी

सांगली : जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाली असून नागरिकांच्या वितरकांकडे रांगा लागल्या आहेत. महिना होऊनही गॅस नोंदणी होत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. दिवसभर रांगेत थांबूनही नागरिकांना गॅस मिळत नसल्यामुळे ते संतप्त भावना व्यक्त करत आहेत.जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. घरगुती गॅसचा अवैध वापर, साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाभर ११ विशेष भरारी पथके सक्रिय केली असून गॅस एजन्सींसह हॉटेल्स, ढाबे आणि व्यावसायिक आस्थापनांवर अचानक तपासण्या सुरू आहेत.जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू केली आहे. घरगुती वापरासाठी असलेले एलपीजी सिलिंडर काही ठिकाणी व्यावसायिक कारणांसाठी वापरले जात असल्याच्या तसेच साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर भूमिका घेत तपासणी मोहीम सुरू केली आहे.प्रशासनाच्या सूचनेनुसार भरारी पथके विविध तालुक्यांमध्ये अचानक भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. विशेषतः हॉटेल्स, ढाबे, केटरिंग व्यवसाय, औद्योगिक युनिट्स आणि संशयित ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत आहे का, याची तपासणी केली जाणार आहे. अवैध वापर, साठेबाजी किंवा काळाबाजार आढळल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

दोषींवर थेट गुन्हे दाखलया भरारी पथकात संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, जिल्हा पुरवठा विभागाचे अधिकारी आणि पुरवठा निरीक्षक यांचा समावेश आहे तसेच भारत पेट्रोलियम (बीपीसीएल), हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) आणि इंडियन इंडेन या तेल कंपन्यांचे विक्री अधिकारीही या पथकासोबत समन्वय साधणार आहेत. तपासणीदरम्यान घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर, अनधिकृत साठेबाजी किंवा काळाबाजार आढळल्यास संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

हॉटेल्स, ढाबे आणि गोदामांवर विशेष लक्षभरारी पथके गॅस एजन्सी, गॅस गोदामे, हॉटेल्स, ढाबे, व्यावसायिक आस्थापना आणि औद्योगिक युनिट्स येथे अचानक तपासणी करणार आहेत. घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर किंवा अनधिकृत विक्री आढळल्यास परवाने निलंबित करणे, दंड आकारणे किंवा गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

तक्रारींसाठी हेल्पलाईनगॅसचा अवैध वापर किंवा काळाबाजार आढळल्यास नागरिकांनी प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घरगुती गॅस पुरवठ्याबाबत अडचणी, तक्रारी किंवा संशयास्पद प्रकार आढळल्यास नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांक १८००२३३३५५५ किंवा ०२३३-२६००५०० या क्रमांकांवर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी सांगितले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gas Shortage: Raids on Homes and Hotels in Sangli District

Web Summary : Sangli faces gas shortages, prompting district-wide raids on homes, hotels, and businesses. Eleven teams are investigating illegal use and black marketing. Citizens are urged to report suspicious activity via helpline.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरCylinderगॅस सिलेंडरSangliसांगली