जिल्ह्यात कोरोनाचे ११ नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:42 IST2021-02-23T04:42:16+5:302021-02-23T04:42:16+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या मर्यादीत असल्याने दिलासा मिळत आहे. सोमवारी दिवसभरात ११ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर ...

जिल्ह्यात कोरोनाचे ११ नवीन रुग्ण
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या मर्यादीत असल्याने दिलासा मिळत आहे. सोमवारी दिवसभरात ११ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर १३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनानेही विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईस सुरुवात केली असून, सध्यातरी बाधितांची संख्या मर्यादित आहे.
आरोग्य विभागाच्यावतीने सोमवारी दिवसभरात आरटीपीसीआरअंतर्गत २६३ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात तिघेजण बाधित आढळले, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ११४३ नमुन्यांतून १० जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक तीन रुग्ण जत तालुक्यात आढळले आहेत; तर महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या घटत एकास निदान झाले आहे.
उपचार घेत असलेल्या १२०रुग्णांपैकी ३२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यात २५ जण ऑक्सिजनवर, तर ७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. व्हेंटिलेटरवर उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ झालेली आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार होत असला, तरी प्रशासनाने मात्र, खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.