जिल्ह्यातील ११ दिव्यांगांनी सर केले कळसूबाई शिखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST2021-01-08T05:28:09+5:302021-01-08T05:28:09+5:30

शिराळा : दिव्यांग टीमने राज्यातील सर्वांत उंच कळसूबाई शिखर सर करून एक आगळेवेगळे साहसी दर्शन घडवून आणले. राज्यातील ७०, ...

11 Divyangs from the district climbed Kalsubai Shikhar | जिल्ह्यातील ११ दिव्यांगांनी सर केले कळसूबाई शिखर

जिल्ह्यातील ११ दिव्यांगांनी सर केले कळसूबाई शिखर

शिराळा : दिव्यांग टीमने राज्यातील सर्वांत उंच कळसूबाई शिखर सर करून एक आगळेवेगळे साहसी दर्शन घडवून आणले. राज्यातील ७०, तर सांगली जिल्ह्यातील ११ दिव्यांग व्यक्तींनी हे शिखर सर केले. यामध्ये शिराळा येथील स्वाती भस्मे हिचा समावेश आहे.

औरंगाबाद येथील शिवुर्जा प्रतिष्ठानमार्फत दिव्यांग व्यक्तींना त्यांच्यातील सुप्तगुणांचे दर्शन घडविण्यासाठी गेल्या आठ वर्षांपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयाेजन केले जाते. यावेळी कळसूबाई शिखर सर करण्याचा संकल्प करण्यात आला हाेता. यामध्ये राज्यातील २० जिल्ह्यांतील १५० पेक्षा जास्त दिव्यांग व्यक्तींनी सहभाग घेतला. हे सर्व दिव्यांग कळसूबाईच्या पायथ्याशी असलेल्या जहागीरदार वाडी येथे एकत्र जमले.

दुपारी दोनच्या दरम्यान त्यांनी शिखर चढण्यास सुरुवात केली. कडाक्याची थंडी आणि जोरदार गार वारा यांची तमा न बाळगता एकमेकांना आधार देत हे सर्वजण हळूहळू शिखर चढत होते. चार तास चालत चालत १६४७ मीटर उंचीचे हे शिखर ७० दिव्यांगांनी सर केले. यामध्ये सांगली जिल्ह्यातील २० जणांनी सहभाग घेतला होता. त्यांपैकी ११ जणांनी हे शिखर सर केले.

चौकट

सांगली टीम

या माेहिमेत सांगली जिल्ह्यातील सुदेश माने, स्वाती भस्मे, माधुरी पाटील, भगवा भंडारे, जारिना मणेर, मयूर ढेकळे, लता पांचाळ, अमर पवार, जयश्री शिंदे, अस्मिता पाटील यांनी सहभाग घेतला.

Web Title: 11 Divyangs from the district climbed Kalsubai Shikhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.