१०८ रुग्णवाहिकेने जिल्ह्यात दहा महिन्यांत ८३१८ जणांना ?????
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:39 IST2020-12-14T04:39:08+5:302020-12-14T04:39:08+5:30
सांगली : तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात वाढलेला कोराेनाचा कहर कमी होऊन दिलासादायक वातावरण सध्या निर्माण झाले असले तरी, कोरोना काळात ...

१०८ रुग्णवाहिकेने जिल्ह्यात दहा महिन्यांत ८३१८ जणांना ?????
सांगली : तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात वाढलेला कोराेनाचा कहर कमी होऊन दिलासादायक वातावरण सध्या निर्माण झाले असले तरी, कोरोना काळात ‘१०८’ रुग्णवाहिका ‘देवदूत’ म्हणून रुग्णांच्या मदतीला धावून आली. त्यामुळेच कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना ८हजार ३१८ जणांचा जीव वेळेत उपचार मिळाल्याने वाचला आहे.
जिल्ह्यात अपघात असो अथवा इतर कोणत्याही संकटावेळी ‘१०८’ रुग्णवाहिकेने कमी वेळेत तिथे पाहोचून अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल केले आहे. नेमके हेच व्रत त्यांना आव्हान बनून समोर आले ते कोरोना कालावधित. लॉकडाऊन असतानाही कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना कमीत-कमी वेळेत उपचारासाठी दाखल करण्यात रुग्णवाहिकेची भूमिका महत्त्वाची ठरली. हेच काम त्यांचे अद्यापही सुरूच आहे.
जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यासाठी या सुविधेचा वापर झाला आहे. सध्या कोरोनास्थिती आटोक्यात असली तरी, इतर आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांंना तात्काळ उपचार व पुढील उपचारासाठी ‘१०८’चा मोठा आधार मिळताना दिसत आहे.