शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
4
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
5
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
6
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
7
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
8
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
9
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
10
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
11
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
12
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
13
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
14
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
15
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
16
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
17
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
18
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
19
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
20
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिलातून सुटका; सांगली जिल्ह्यातील १०२६ ग्राहकांनी घरावर बसवली सौरऊर्जा यंत्रणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 16:00 IST

परंपरागत साधनांवरील ताण कमी करण्यासाठी सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेतून वीजनिर्मितीची यंत्रणा बसविण्याबाबत गेल्या काही वर्षांपासून जागृती होत आहे

सांगली : पारंपरिक ऊर्जा साधनांवरील भार कमी करण्यासाठी शासनातर्फे सौरऊर्जेचा वापर करण्याबाबत आवाहन व जागृती केली जात आहे. त्याचा परिणाम गेल्या काही वर्षांपासून दिसून येत आहे. जिल्ह्यातील १०२६ ग्राहकांनी सौरऊर्जा यंत्रणा बसवली आहे. त्यापासून प्रतिमहिना ११ लाख ७७ हजार युनिट वीजनिर्मिती होत आहे. सौरऊर्जेपासून वीजनिर्मितीमुळे संबंधितांच्या वीज बिलाची रक्कमही कमी होऊ लागली आहे.परंपरागत साधनांवरील ताण कमी करण्यासाठी सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेतून वीजनिर्मितीची यंत्रणा बसविण्याबाबत गेल्या काही वर्षांपासून जागृती होत आहे. या यंत्रणेमुळे अनेक ग्राहकांची वीज बिले शून्यावर आली आहेत. नाममात्र बिल महिनाकाठी येत असल्यामुळे परंपरागत विजेची बचत होऊ लागली आहे. सध्या दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत आहे.वीज बिलासाठीचे विविध करही वाढत आहेत. त्यामुळे बिलाचा आकडाही वाढत आहे. यातून दिलासा मिळण्यासाठी सौरऊर्जेचा वापर आवश्यक बनत आहे. केंद्र सरकारनेदेखील त्यासाठी ग्राहकांना ४० टक्केपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

सौरऊर्जेसाठी करा ऑनलाईन अर्ज

महावितरणने रुफटॉप सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा उभारण्यासाठी एजन्सीजची नियुक्ती केली आहे. त्याची यादी आणि ऑनलाईन अर्जाची सोय महावितरणच्या महाडिस्कॉम डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध आहे. वीज ग्राहक ऑनलाईन अर्ज करू शकतात.

कोणाला करता येणार अर्ज?या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व नागरिक घेऊ शकतात. रूफटॉप सोलर योजनेच्या माध्यमातून तयार झालेली अतिरिक्त ऊर्जा लाभार्थी ३० पैसे प्रतियुनिटने विद्युत मंडळाला विकून आर्थिक लाभ मिळवू शकतात.

किती मिळते अनुदान?

घरगुती ग्राहकांना छतावर एक ते तीन किलोवॅट सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. तीन किलोवॅटपेक्षा अधिक असेल तर २० टक्के अनुदान मिळते.

तीन वर्षांत पैसे वसूलसौर यंत्रणा उभारणीच्या खर्चाची साधारणतः तीन वर्षांत परतफेड होणार आहे. दरमहा वीजबिलातील आर्थिक बचत तसेच पर्यावरणस्नेही ग्राहक म्हणून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील वीजग्राहकांना रुफटॉप सौरऊर्जा योजनेचा फायदा होत आहे. तसेच सौरऊर्जेपासून वीजनिर्मितीमुळे संबंधितांच्या वीज बिलाची रक्कमही कमी होत आहे.

घरगुती ग्राहकांकडील एक किलोवॅट क्षमतेच्या सौर यंत्रणेमधून वीजबिलामध्ये सध्याच्या वीजदरानुसार दरमहा सुमारे ५५० रुपयांची बचत होऊ शकेल. या यंत्रणेला लावण्यात आलेल्या नेटमीटरिंगद्वारे वर्षाअखेर शिल्लक वीज प्रतियुनिट प्रमाणे महावितरणकडून विकत घेण्यात येत आहे. त्याचाही आर्थिक फायदा संबंधितांना मिळत आहे. तसेच वीजबिलातून कायमची सुटका झाली आहे. - महेश पाटील, वीज ग्राहक.

 

सौरऊर्जा यंत्रणा बसविल्यामुळे वीज जाण्याची चिंता संपली आहे. दिवसेंदिवस वाढत्या वीज बिलाचाही प्रश्न सुटला आहे. पावसाळ्यात महिनाभर अडचणी आहेत, पण उर्वरित ११ महिने फायदाच आहे. - विष्णू शिंदे, वीज ग्राहक.

सौर यंत्रणा उभारणीमुळे दरमहा वीजबिलातील आर्थिक बचत तसेच पर्यावरणस्नेही ग्राहक म्हणून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील वीजग्राहकांनी रुफटॉप सौरऊर्जा योजनेत सहभागी होण्याची गरज आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण (मेडा) संस्थेकडून राबविला जात आहे. - धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंता, महावितरण.

टॅग्स :Sangliसांगलीelectricityवीज