तासगाव तालुक्यात दिवसात १०६ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:26 IST2021-04-25T04:26:57+5:302021-04-25T04:26:57+5:30
तालुक्यात शनिवारी २६ गावात मिळून १०६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तासगाव शहरात १४, तर मणेराजुरी येथे सर्वाधिक १९ रुग्ण ...

तासगाव तालुक्यात दिवसात १०६ बाधित
तालुक्यात शनिवारी २६ गावात मिळून १०६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तासगाव शहरात १४, तर मणेराजुरी येथे सर्वाधिक १९ रुग्ण आढळून आले. त्यापाठोपाठ जरंडी येथे ११, आळते दोन, अंजनी दोन, बस्तवडे एक, बोरगाव चार, हातनूर एक, जुळेवाडी एक, कवठेएकंद तीन, कुमठे चार, लोकरेवाडी एक, मांजर्डे एक, मतकुणकी एक, निमणी दोन, निंबळक एक , पेड दोन, राजापूर नऊ, सावळज आठ, नागावकवठे दोन, शिरगाव( वि.) तीन, सिद्धेवाडी दोन, तुरची एक, वडगाव सात, वासुंबे दोन, येळावी दोन, असे रुग्ण आढळून आले.
तालुक्यात आजअखेर ४ हजार ७६५ रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी ३ हजार ६७६ पूर्णपणे बरे झाले आहेत. सत्तावीस रुग्णांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. ६९६ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू असून, आजअखेर १८८ कोरोनाबाधित यांचा मृत्यू झाला आहे, तर शनिवारी ३०९ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली होती.