शिराळा तालुक्यात १०४ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:21 IST2021-06-05T04:21:04+5:302021-06-05T04:21:04+5:30

शिराळा : तालुक्यात शुक्रवारी ३३ गावांमध्ये १०४ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शिराळा, मांगले, सांगाव, गिरजवडे, ...

104 patients in Shirala taluka | शिराळा तालुक्यात १०४ रुग्ण

शिराळा तालुक्यात १०४ रुग्ण

शिराळा : तालुक्यात शुक्रवारी ३३ गावांमध्ये १०४ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शिराळा, मांगले, सांगाव, गिरजवडे, मणदूर, तडवळे ही हॉटस्पॉट गावे झाली आहेत.

अंत्री बुद्रुक १३, शिराळा, मांगले प्रत्येकी ७, कांदे, मालेवाडी, तडवळे प्रत्येकी ६, इंगरुळ, शिवरवाडी, सोनवडे प्रत्येकी ५, चिंचोली, मणदूर, अटूगडेवाडी, निगडी प्रत्येकी ४ यासह ३३ गावांत १०४ रुग्ण आढळून आले आहेत. एकूण १२९० ॲक्टिव्ह रुग्ण असून गृह विलगीकरण कक्ष ११८३, संस्था विलगीकरण कक्ष १८, उपजिल्हा रुग्णालय ४९, कोकरूड ग्रामीण रुग्णालय १७, स्वस्तिक कोविड सेंटर ११, मिरज कोविड रुग्णालय ४, सांगली शासकीय रुग्णालय २, खासगी रुग्णालय ५ असे रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: 104 patients in Shirala taluka