शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीत १०० गुणांच्या लेखी परीक्षेने ग्रामीण टक्का घसरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 13:16 IST

पुरेशा मार्गदर्शनाअभावी लेखी परीक्षेत दांडी उडते, परिणामी पोलीस खात्यात ग्रामीण महाराष्ट्राचा टक्का घसरण्याची भीती

संतोष भिसेसांगली : पोलीस भरतीत १०० गुणांच्या लेखी परीक्षेमुळे ग्रामीण तरुण भरती प्रक्रियेतून बाहेर फेकले जात आहेत. पुरेशा मार्गदर्शनाअभावी लेखी परीक्षेत दांडी उडते, परिणामी पोलीस खात्यात ग्रामीण महाराष्ट्राचा टक्का घसरण्याची भीती व्यक्त होत आहे. मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षा ५० गुणांची करण्याची मागणी होत आहे.पोलिसात शहरी तरुण आणि अधिकाऱ्यांचाच भरणा झाल्यास सामाजिक समतोल ढासळण्याची भीती आहे. ग्रामीण मुले शारीरिकदृष्ट्या सक्षम असूनही खाकी वर्दी पासून वंचित राहत आहेत. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या काळात मैदानी चाचणी १०० गुणांची होती. लेखी ७५ गुणांची व मुलाखत २५ गुणांसाठी होती. मुलाखतीत संशयास्पद प्रकाराच्या शक्यतेने २०१० मध्ये ती पद्धत बंद करण्यात आली. लेखी व मैदानी चाचण्या प्रत्येकी १०० गुणांच्या केल्या.

नंतर फडणवीस सरकारने मैदानी ५० व लेखी चाचणी १०० गुणांची केली. त्यामुळे ग्रामीण तरुणांची मोठी पीछेहाट झाली. महाविकास आघाडी सरकारने पॅटर्न पुन्हा १००-१०० गुणांचा केला. २०२१ मधील परीक्षांमध्ये हाच पॅटर्न राहिला. आता तोदेखील बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत.परीक्षांचा बदलता पॅटर्न ग्रामीण तरुणांना त्रासदायी ठरत आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम असतानाही लेखी परीक्षेत दांडी उडते. ग्रामीण भागात तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत नाही. शिकवणीही लावता येत नाही. त्यामुळे शारीरिक तंदुरुस्तीवरच भर असतो, पण लेखी परीक्षेचा टप्पा पार करण्यात अयशस्वी ठरतात. त्यामुळे लेखी परीक्षा ५० गुणांची करण्याची मागणी आहे.

१०० गुणांच्या लेखी परीक्षेने ग्रामीण तरुण भरतीतून बाहेर पडतात, त्यामुळे शासनाने याचा फेरविचार करायला हवा. १०० गुणांची मैदानी चाचणी प्रथम घ्यावी, त्यात उत्तीर्ण झालेल्यांचीच लेखी परीक्षा घ्यावी. यामुळे ग्रामीण तरुणांनाही क्षमता दाखविता येईल. - प्रा. रणजीत चव्हाण, पोलीस भरती मार्गदर्शक, सांगली.

२०१९ पूर्वीच्या पोलीस भरतीत १०० गुणांची मैदानी व नंतर ५० गुणांची लेखी परीक्षा व्हायची. त्यानंतर मात्र दोन्ही परीक्षा १०० गुणांच्या केल्या. मैदानी चाचणी नंतर घेतली जाते. ग्रामीण भागात मार्गदर्शन केंद्रांअभावी तरुण मागे पडतात. शहरी विद्यार्थी लेखी परीक्षेत बाजी मारतात. ग्रामीण उमेदवार मैदानी परीक्षेत सक्षम व पात्र असूनही लेखी परीक्षेच्या फेरीत बाहेर फेकले जातात. नवा पॅटर्न ग्रामीण तरुणांवर अन्यायकारक आहे. तो बंद करावा. - संगीता खटावकर, राज्य कार्यकारिणी सदस्या, पुरोगामी संघर्ष परिषद.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस