शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 17:39 IST

महापूर, अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी देण्याच्या मागणीचा ठराव जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत केला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी कराकाँग्रेस आणि भाजप सदस्यांमध्ये वाद रंगला

सांगली : महापूर, अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी देण्याच्या मागणीचा ठराव जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत केला. तसेच विकास कामाच्या उद्घाटनासाठी ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना बोलावत नाहीत, यावरुन भाजप व काँग्रेस सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावर जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी, विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमास सदस्यांना बोलाविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.संग्रामसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. यावेळी उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती डॉ. सुषमा नायकवडी, अरुण राजमाने, ब्रम्हदेव पडळकर, तम्मणगौडा रवी-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे आदी उपस्थित होते.सभेत जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी, दुष्काळ, महापूर आणि आता अवकाळी पावसामुळे शेतकºयांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शंभर टक्के कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, अशा मागणीचा ठराव मांडला. त्यास जितेंद्र पाटील यांनी पाठिंबा देत, तो सभागृहाने मंजूर करण्याची मागणी केली. यावर संग्रामसिंह देशमुख यांनी, ठराव मंजूर करुन शासनाकडे पाठवू, असे आश्वासन दिले.डी. के. पाटील, प्रमोद शेंडगे यांनी, ग्रामपंचायतीला विविध योजनेतून निधी जिल्हा परिषदेतून दिला जातो. या विकास कामांच्या उद्घाटनाला ग्रामपंचायत सदस्यांना बोलावत नाहीत, याबद्दल नाराजी व्यक्त केली.

पाटील, शेंडगे यांनी समाजकल्याण सभापती ब्रम्हदेव पडळकर यांनाही जाब विचारला. यावर काँग्रेसचे सदस्य जितेंद्र पाटील यांनी, ग्रामपंचायतीनी विकास कामाच्या उद्घाटनाला कुणाला बोलवायचे, हा त्यांचा अधिकार आहे. सदस्यांना उद्घाटनास बोलविले नाही, म्हणून त्यांनी सभागृहात या विषयावर चर्चा करण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले. यावरून काँग्रेस आणि भाजप सदस्यांमध्ये वाद रंगला. अखेर राष्ट्रवादीचे सदस्य संभाजी कचरे यांनी, जितेंद्र पाटील व प्रमोद शेंडगे यांना शांत करुन वादावर पडदा टाकला.संग्रामसिंह देशमुख यांनी, ग्रामपंचायतीचा निर्णय काहीही असो, जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी विकास कामाच्या उद्घाटनाला जि. प. सदस्य व पंचायत समिती सदस्यांना बोलाविले पाहिजे. पत्रिकेतही नाव घातले पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

टॅग्स :zpजिल्हा परिषदSangliसांगली